Maharashtra News LIVE : अतिवृष्टीचा इशारा; शनिवारी-रविवारीही केडीएमसीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश
Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.अनेक भागात नदी नाले एक झाले आहेत. तर दमदार पावसामुळे पेरणीला वेग आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर आहे.

Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने उशीरा का असेना चांगली धडक दिली. तळकोकणापासून ते मुंबईपर्यंत ढगांची गर्दी जमली आहे. राज्यात सर्वदूर पावसाच्या आगमनाने डोंगररागांनी हिरवाईचा शालू नेसला आहे. तर धबधबे प्रवाहित झाले आहेत. राज्यातील अनेक भागात दमदार पावसामुळे नदीनाले एक झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. तर पहिल्याच जोरदार पावसामुळे प्रशासनाचे पितळ उघडं पडलं आहे. मान्सूनपूर्व साफसफाईची कामे न केल्याने अनेक शहरात रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. संसारपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे.
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरे हे नुकताच बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करून आले आहेत. ते परतले नाही तोच त्यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे गटात उडी घेतली. ते आता विधान परिषदचे उपसभापति आहेत. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने आनंदवार्ता दिली आहे. तर शेतीकामांसाठी गौण खनिजांवरील रॉयल्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
अवैध धंद्याविरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम याचे चार दिवसापासून उपोषण
सोलापूर शहरात बेकायदा आणि अवैध धंदे आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम हे चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली गेली जात नाहीत. बडतर्फ कर्मचारी बाळासाहेब गायकवाड नमक व्यक्तीला पोलीस खात्यात पुन्हा सेवेत घेतले गेल्याने संताप व्यक्त केला आहे.
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात विशेष उपक्रमाला सुरुवात
स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात विशेष उपक्रमाला सुरुवात होत आहे. संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित शंभर व्हिडिओंच्या मालिकेचा समारोप आणि “असू आम्ही सुखाने, पत्थर पायातील” या दृकश्राव्य मालिकेच्या १०१ व्या भागाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
-
-
मुंबई लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय
मुंबई लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत.
-
अतिवृष्टीचा इशारा; शनिवारी-रविवारीही केडीएमसीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश
हवामान खात्याने ४ आणि ५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने केडीएमसी प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आयुक्तांनी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवार आणि रविवार कार्यालयीन सुट्टी असतानाही कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
-
सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका कायम आहे: परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यामध्ये सिंधू पाणी कराराचाही समावेश होता, ज्यावर मंत्रालयाने पुनरुच्चार केला की सिंधू पाणी करार सध्या स्थगित आहे. भारताची भूमिका कायम आहे.
-
-
शाळेच्या नावाखाली सरकारची जागा हडप केली, किरीट सोमय्या यांचा आरोप
जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील एका इग्रंजी शाळेतल्या व्हायरल पाकिस्तानी गाण्याच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमया यांनी शाळेची पाहणी केली.परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कुलमधील पाकिस्तानी गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करीत संस्थाचालकावर कारवाई केली आहे.शाळा असलेली जागा सरकारची आहे, मात्र शाळेच्या नावाखाली सरकारची जागा हडप केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
-
संत सोपानदेव महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त सासवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती
संत सोपानदेव महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त सासवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहीती आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
-
केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरण : आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुणे येथील केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणातील अटक झालेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. सरकारी पक्षाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने ती मान्य केली नाही. ज्या कारणासाठी त्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली ती पुरेशी नसल्यााचे कोर्टाने म्हटले आहे.
-
बीड – जून संपला तरी बीड जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा कायम
जून महिना संपला असला तरी बीड जिल्ह्याक समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सरासरीचा विचार केला तर 90 टक्के पाऊस झाला असला तरी तो सलग झालेला नसल्याने अनेक भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 8 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून यापैकी 2 लाख 12 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये 90 हजार हेक्टरवर कापूस तर 1 लाख 6 हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे.
-
ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर लिंबाचे झाड कोसळले
नाशिकच्या लासलगावमधील ब्राह्मणगाव (विंचूर) येथील जिल्हा परिषद शाळेवर लिंबाचे झाड कोसळले आहे. यामुळे छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले आहे, 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित आहेत. शाळेवरील पत्रे नवीन असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
-
भेसळमुक्त दूध मिळण्यासाठी नवे नियम लागू होणार – तुकाराम मुंढे
भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळण्यासाठी नवे नियम लागू होणार आहेत. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली आहे. दूध संकलन करताना, त्यावर प्रक्रिया करताना नियमावली लवकरच जाहीर होणार आहे. याबाबत दूध उत्पादकांची बैठक घेतली असल्याचीही माहिती समोर आली आहे.
-
मुसळधार पावसानंतर रायगडमधील धबधबे प्रवाहित
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धपकी धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत असून निसर्गरम्य दृश्य अनुभवायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे परिसरात पाणीप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांची वर्दळ अत्यल्प आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
-
इचलकरंजीत एचएसआरसी नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई
इचलकरंजी शहरामध्ये एक जुलैपासून प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने ज्यांनी एचएसआरसी नंबरप्लेट करून घेतली नाही, त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये आरटीओने सुमारे 30 वाहनांवर कारवाई करून सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
-
उमरग्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात विराट मोर्चा
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती’च्या वतीने हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
-
अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा
अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपुरात राडा. प्रशासनाविरोधात नगराध्यक्षांसह सत्ताधारी, विरोधी नगरसेवक एकत्र. अतिक्रमण हटवलेल्या व्यापाऱ्यांसह अधिकाऱ्यांना नगराध्यक्षांचा जाब. व्यापाऱ्यांना आधी नोटीस व मुदत द्या, मगच कारवाई करा- नगराध्यक्षांची भूमिका
-
राज्यातील घाटमाथ्यावर येत्या 4 दिवसात पावसाचा रेड अलर्ट
राज्यातील घाटमाथ्यावर येत्या 4 दिवसात पावसाचा रेड अलर्ट. येत्या 4 ते 5 दिवसात विक्रमी पावसाचा अंदाज. जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या 4 दिवसात भरून निघेल- हवामान विभाग प्रमुख एस. डी सानप यांची माहिती
-
शाळेच्या 500 मीटर परिसरात स्टींग एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी
राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी. विधानसभेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचे निर्देश
-
सिंधुदुर्गात राजू शेट्टींच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन सुरु
सिंधुदुर्गात राजू शेट्टींच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन सुरु. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन. आंबा काजू नुकसान भरपाईबाबत आंदोलक आक्रमक
-
उद्धव ठाकरेंचा सरकारव इशारा
राजकारणासाठी पैसा वापरला जाते असे बोलणे बालिशपणा आहे असे म्हणणे. पूर्वी राणा दाम्पत्यांना हनुमान चालीसा वाचली म्हणून अटक केला, आता हनुमान चालीसा वाचणार, या निमित्ताने तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळतोय. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूची गरज नाही. तुमच्या मिरवणुकीत नाचणारा मुसा, हा सगळा बेगडी प्रेम आहे. हिंदूचा नारा घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्या. ज्या पक्षाला सोबत घेतले त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा. सगळ्याच चुकीचे पश्चाताप करण्यासाठी दादरला जाऊन हनुमान चालिसा वाचावी आणि हनुमानाला चुकले म्हणून माफी मागा. ज्याने लूट केली असेल त्याला आम्ही माफ करणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. जिथे श्रध्दा आहे तेथे लूट होऊ नये. राममंदिराची रथयात्रा अडवाणी यांनी काढली तेंव्हा मोठा प्रतिसाद मिळाला, घुमट पडल्यानंतर एकमेव शेर, वाघ बाळासहानी वक्तव्य केले होते शिवसैनिक असतील तर मला गर्व आहे. त्याच क्रेडिट घेऊ नका, ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. म्हणजे अमित शहा यांना राम पावत नाही तो पर्यंत तुम्ही जाणार नाही असे म्हणायचे का? उभारणी करण्यात त्यांचा हात आहेत. सगळ्यांनी कशाला यावा, हनुमान चालीसा वाचून तुम्ही हिंदूंची माफी मागणार आहात का? असे रामाचा नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू नये.. हिंदूंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही. अगोदर पक्षाला जागे करा, स्वतः जागे व्हा, आजूबाजूला असलेल्या चांडाळ चौकडीला जागे करा मग देशाचा विचार करा..
-
तीन दिवसांच्या दमदार पावसाने गोंदियाला दिलासा
तीन दिवसांच्या दमदार पावसाने गोंदियाला दिलासा. शेतीला वेग, काही गावांचा संपर्क तुटला. जूनचा पावसाचा तुटवडा जुलैत भरून निघाला. गोंदियात पावसाचे दमदार पुनरागमन. गोंदियात पावसाची जोरदार हजेरी. भात पेरणीला वेग, लहान पुलांवरून पाणी. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद. ग्रामीण भागात पूल पाण्याखाली. गोंदियात सलग पावसाचा जोर कायम….
-
नवी मुंबतील कांदा बटाटा मार्केट मध्ये साचलं पाणी
नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यातच एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केटमध्ये देखील पाणी साचल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे. परराज्यातून मालाच्या गाडा या ठिकाणी येत असतात मात्र पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे पुन्हा एकदा एपीएमसी प्रशासनावर नालेसफाई संबंधित प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-
बीडच्या धारूर बस स्थानकात तरुणाचा गोंधळ
बीडच्या धारूर बस स्थानकात मद्यधुंद तरुणाने किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत राडा घातला. काही प्रवाशांशी हुज्जत घालत राडा घातला. बराच वेळ हा गोंधळ चालू राहिल्याने धारूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला ताब्यात घेतले. या तरूणाने मारहाण केल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
-
भाजपच्या सत्तेचं मूळ राम मंदिर – उद्धव ठाकरे
“भाजपच्या सत्तेचं मूळ राम मंदिर आहे. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं. त्यात अनेक शिवसैनिक सहभागी होते. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. ती दृश्य जनतेच्या मनात रुजलेली आहेत. राम मंदिराच्या मुद्याला भाजपने हात घातला. आज अमर्यादा सत्ता उपभोगत आहेत” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
“राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणीन हिंदू माफ नही करेगा. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करणार आहोत. दादरमध्ये मारुतीच मंदिर आहे तिथे चारच्या सुमारास जमणार आहोत. राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहोत” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
-
निचऱ्यासाठी खोदलेल्या खड्डयात बुडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पुण्यातील लोणी काळभोर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले खड्डे सुरक्षाव्यवस्था न करता उघडे ठेवल्याने दोन वर्षीय सोहम लखन कसबे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
-
अण्णा हजारेंचे 5 जुलैचे उपोषण स्थगित
अण्णा हजारेंचे 5 जुलैचे उपोषण स्थगित. माहिती अधिकार नियमातील बदलांना सरकारची स्थगिती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अण्णांचा निर्णय. केवळ स्थगिती नव्हे, नवे नियम रद्द करा अशी अण्णांची मागणी आहे. माहिती अधिकार कायदा जनतेसाठी असल्याचा पुनरुच्चार करत तरुणांनी व जनतेने बदलांना विरोध करावा असं अण्णा म्हणाले. नियम रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा.
-
खंडाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावताच वर्षाविहाराला खऱ्या अर्थाने सुरुवात
लोणावळा-खंडाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावताच वर्षाविहाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अवघ्या ४८ तासांत २२९ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येथील सांडव्यावरून पाणी फेसाळत वाहू लागल्याने भुशी धरणाचे निसर्गसौंदर्य खुलले असून, भुशी धरणावर पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे.
-
पुलावरून पाणी वाहत असल्याने बबई-कमरगाव मार्ग बंद…
गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांत मुसळधार पाऊस पडला त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत…. तर मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रोड रस्ते लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद आहेत… गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई – कमरगाव हा मार्ग देखील पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद असून दोन्ही गावातील आपसातील संपर्क तुटला आहे…..
-
मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रोहा तालुक्यातील नागोठणे येथील अंबा नदीची सध्याची पाणीपातळी ८.८५ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून धोका पातळी ९.०० मीटर असल्याने नदी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर कुंडलिका नदीची सध्याची पाणीपातळी २३ मीटर इतकी असून तिने इशारा पातळी गाठली आहे.
-
चाकण बस स्थानक परिसरात एका व्यक्तीला टोळक्याकडून बेदम मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एसटी बस स्थानक सध्या प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा गुन्हेगारी आणि असामाजिक प्रकारांमुळे चर्चेत आले आहे. बस स्थानक परिसरात टोळक्यांचा वावर वाढला असून नशेखोर आणि समाजकंटकांनी अक्षरशः हैदोस घातल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बस स्थानक परिसरात एका व्यक्तीला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
लोणावळा-खंडाळ्यात पावसाची दमदार हजेरी, भुशी धरण ओव्हरफ्लो
लोणावळा-खंडाळ्यात पावसाने दमदार हजेरी लावताच वर्षाविहाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अवघ्या ४८ तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
येथील सांडव्यावरून पाणी फेसाळत वाहू लागल्याने भुशी धरणाचे निसर्गसौंदर्य खुलले असून, भुशी धरणावर पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची प्रचंड मोठी उसळी
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे सोन्याच्या दरात 3 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 895 रुपयांवर पोहोचले असून चांदीच्या दरांनी जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
-
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस पुण्यासाठी रेड अलर्ट जारी
पुण्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस पुण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
मुंबई – पावसामुळे पश्चिम विरुद्ध गती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू
मुंबई – पावसाचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर झाला असून पश्चिम विरुद्ध गती मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुंबई दोन दिवसांपासून सुरू आहे पाऊस, त्यामुळे रस्ते ओले झाले आहेत. त्याचा परिणाम पूर्णतः वाहतुकीवर झाला आहे.
-
पुण्यातील रास्ता पेठ मंगलमूर्ती चौकात झाड पडून मोठी दुर्घटना, सुदैवाने कोणीही जखमी नाही
पुण्यातील रास्ता पेठ मंगलमूर्ती चौकात सकाळी साडेतीन वाजता झाड पडून मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र झाड पडल्यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून झाड हटवण्याचे काम सुरू आहे.
-
मुसळधार पावसामुळे घाटातील चार ठिकाणी संरक्षक भिंती धोकादायक अवस्थेत
काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या, तर काही ठिकाणी भिंतींचा पाया खचला. संरक्षक भिंती कमकुवत झाल्याने दरड कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका वाढला. घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्याने अपघाताची शक्यता अधिक. दररोज हजारो वाहनांची या घाटातून वाहतूक होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या आहेत, तेथे प्रशासनाने केवळ लोखंडी पिंप उभे केले आहेत.
-
जळगावात लाचखोरीप्रकरणी अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या घराची एसीबीकडून ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती
मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या संयुक्त पथकाकडून ‘इन-कॅमेरा’ तपासणी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचे पथकाकडून रात्री उशिरापर्यंत इन-कॅमेरा’ तपासणी सुरू होती, अशी माहिती मिळाली. या कारवाईत नेमके काय सापडले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मोठे घबाड हाती लागल्याचे बोलले जात आहे.
-
इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई
समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा येथील इंटरचेंज जवळ लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा कंटेनर घेतला ताब्यात. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गुटख्याने भरलेला कंटेनर केला जप्त. तीन इसमान विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल
-
नवी मुंबईत दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का, कार्यकारी अभियंता निलंबित
नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या गंभीर प्रकरणात नवी मुंबई महापालिकेने पहिली मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. महापालिका परिमंडळ-१ येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना गुरुवारी तात्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने हा अपघात घडल्याचे नमूद करत, कार्यालयप्रमुख म्हणून कामावर नियंत्रणाचा अभाव आणि कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
-
मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात पाणीच पाणी
मुंबई गोवा महामार्ग पहिल्याच पावसात नागोठणे जवळील चिकणी या ठिकाणी पाणी. याच पाण्यातून सध्या वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे. या साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये.
-
सिया-चेतनला न्यायालयात हजर केलं जाणार, मोठ्या घडामोडी
केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. न्यायाधीश ए एम विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडेल. सियाने तिचा युक्तिवाद वकील विपुल दूशिंग हेचं करतील असं न्यायालयात म्हटल्यानं आता वकील आशुतोष श्रीवास्तवांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील. तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड कामकाज पाहतील.
-
स्मार्ट मीटरला स्थगिती देण्याची भाजप आमदाराची मागणी
स्मार्ट मीटरला स्थगिती देण्याची भाजप आमदाराची मागणी आहे. सोलापूरचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत मागणी केली आहे. स्मार्ट मिटर लावल्यामुळे वीज बिलामध्ये दुपटीने वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येतं आहेत. त्यामुळे या स्मार्ट मध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का याची तपासणी करण्यात यावी. मागील काही महिन्यात ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत त्यांच्या विजाबीलात मोठी वाढ झाल्याची तक्रार आहेत. या संदर्भात महावितरणचे अधिकारी कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे या मीटरमध्ये कोणती तांत्रिक अडचण असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती कोणावर करण्यात येऊ नये.
-
पुरंदर विमानतळासाठी संमतीची मुदत १५ जुलैपर्यंत
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासंदर्भातील करारनाम्यांद्वारे संमती देण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत १,२१६ हेक्टरपैकी १,०१० हेक्टर जमीन संपादित झाली असून सुमारे १,१५० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. उर्वरित भूसंपादनासाठी आणि १० टक्के विकसित भूखंडाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
-
परशुराम घाटात आणखी एक नवा धोका
चिपळूणच्या परशुराम घाटात आणखी एक नवा धोका निर्माण झाला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीट मार्ग खचला आहे. पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनल तुटले आहे. तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. घाटाच्या संरक्षण व्यवस्थेलाच तडा गेला. गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली आहे. त्यामुळे दुहेरी धोक्यामुळे परशुराम घाटाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घाट संरक्षणाचे काम ऐरणीवर आले आहे. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटविण्याची गरज आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच 109 दिवसांत 19 वेळा आवाज आला. काल उशिरा पुन्हा जिल्ह्यात गूढ आवाज आला. दारे-खिडक्या हादरल्या. प्राथमिक अंदाजानुसार, हिंगोलीतील 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचा परिणाम असू शकतो आसा एक्सपर्ट चा अंदाज आहे. 2 एप्रिल 2025 रोजी पत्र पाठवूनही 120 दिवसांपासून तज्ज्ञांचे पथक दाखल नसल्याची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती दिली. नागपूरच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हा प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी अद्याप नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गूढ आवाजांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
पावसानंतरही पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई
मान्सून सक्रिय होऊनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. जिल्हा प्रशासनाच्या १५१ टँकरद्वारे २५७ गावे आणि ६३२ वाड्यावस्त्यांतील २ लाख ५८ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यांत सर्वाधिक टँकर सुरू असून, भूजलपातळी न वाढल्याने टँकरवरील अवलंबित्व अद्याप कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
-
मुंबईत पावसाची रिपरिप
काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. अंधेरी सबवे गेल्या 15 मिनिटांपासून बंद करण्यात आला होता. सध्या पाणी कमी झाल्यानंतर वाहनांच्या वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे.
-
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आज उद्धव ठाकरे यांची दुपारी पत्रकार परिषद आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. पक्ष बांधणीसाठी हा दौरा महत्त्वाचा होता. मुंबईत येताच त्यांचे जवळचे सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या सर्व घडामोडींवर आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Published On - Jul 03,2026 7:59 AM
