AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नकाच! 3 तास मोठा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर, थेट..

Rain Update : राज्यात पावसाचे तांडव बघायला मिळतंय. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला.

Rain Update : महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नकाच! 3 तास मोठा धोका, प्रशासन अलर्ट मोडवर, थेट..
Rain Update
| Updated on: Jul 03, 2026 | 7:13 AM
Share

राज्यात मॉन्सूनची प्रगती बघायला मिळतंय. सर्वदूर पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पाऊस सुरू होता. काल अनेक सखल भागात पाणी साचले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पेरण्या रखडल्या होत्या. अखेर पेरण्यांच्या कामांना शेतकरी लागले आहेत. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस नसल्याचे सांगितले जात होते. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. केरळमध्ये दोन दिवस उशिरा मॉन्सून दाखल झाल्यानंतर 15 दिवस तो अरबी समुद्रातच रेंगाळत होता. अखेर दमदार मॉन्सून हजेरी लावताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला आज रेड अलर्ट जारी केला. मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच गरज असेल तरच आज घराबाहेर पडा.

पावसामुळे पाणी साचल्याने मुंबई सबवे आज बंद करण्यात आला. मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग बघायला मिळतंय. काल दिवसभर पावसाची संतधार पुण्यात होती. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यामध्येच आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघरला मंत्रालयाकडून देण्यात आला.

अंधेरी परिसरात रात्रभर मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा मार्ग असणार अंधेरी सब वे बंद करण्यात आला आहे. साकीनाका येथील घटनेनंतर पालिकेला जाग आली असून मुंबई पालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे अंधेरी परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे.

हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोकणातही पावसाने मोठा धुमाकूळ घातला. पावसाचे तांडव बघायला मिळतंय. मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. राज्यातील इतरही भागात पाऊस सुरू आहे. बीड, हिंगोली, जालना, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ