AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Alert : रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-ठाण्यात पुन्हा पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, वाहतुक कोंडी, मुंबईकरांची प्रचंड दमछाक

Mumbai Rain Alert : भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला. पुणे, रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Mumbai Rain Alert : रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-ठाण्यात पुन्हा पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, वाहतुक कोंडी, मुंबईकरांची प्रचंड दमछाक
Mumbai Rain Alert
| Updated on: Jul 03, 2026 | 10:59 AM
Share

Mumbai Rain Alert : राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईमध्ये तर सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आज भारतीय हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच मंत्रालयाकडून मुंबईसह उपनगरे, पालघर आणि ठाण्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील 3 तासांसाठी दिला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. अंधेरीचा सबवे बंद आहे. पूर्ण पाणी तिथे साचले आहे. काल अनेक भागात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाने मुंबईकरांना अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाची संतातधार सुरु होती. काल रात्री 12 वाजल्या पासून 26 मिलिमिटर पावसाची नोंद झाली तर दिवसभरात 84 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

वांद्रेतील कलानगर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विविध भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. पाणी निचरले की, पुन्हा अंधेरी सबवे सुरू करण्यात येईल.

दुसरीकडे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने केला. कोकणात तर पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पुढील काही दिवस पाऊस अशाचप्रकारे सुरू राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 दिवसांकरिता पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. राज्यात पावसाचा जोर वाढत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ