AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली, गेमचेंजर साबित होणार ?

Moderna आणि Merck च्या mRNA कर्करोग उपचार लसींनी मेलेनोमासाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आश्वासक रिजल्ट दिले आहेत. रुग्णाच्या ट्यूमरनुसार तयार केलेल्या या लसी, कर्करोगाला ओळखतात आणि रोगप्रतिकार प्रणालीला तयार करतात.

कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली, गेमचेंजर साबित होणार ?
cancer vaccine
| Updated on: Aug 20, 2026 | 10:37 PM
Share

कॅन्सरवर उपचाराचा अवाढव्य खर्च आणि यातना सहन करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकेची कंपनी मॉर्डना (Moderna) आणि औषध कंपनी मर्कने ( Merck ) एमआरएनए ( mRNA ) आधारित पर्सनलाईज्ड कॅन्सर थेरेपी व्हॅक्सीन तयार केली आहे. मेलानोमा म्हणजे त्वचेच्या कॅन्सर असलेल्या रुग्णांवर केलेल्या मोठ्या व्यापक परीक्षात या लसीला मोठे यश मिळाले आहे. ही व्हॅक्सीन प्रत्येक रुग्णांपैकी एक सारखी नसणार तर प्रत्येक रुग्णाच्या ट्युमरच्या तपासणी आधारे केली जाणार आहे.

म्हणजेच आधी डॉक्टर हे पाहणार की रुग्णाच्या कॅन्सर मध्ये कोण-कोणते खास जेनेटिक चेंजेस आहेत. त्यानंतर त्या बदलाच्या आधारे व्हॅक्सीन तयार केली जाणार आहे. याचा हेतू शरीराच्या रोग प्रतिकारक क्षमतेला कॅन्सरची ओळखणे आणि त्याच्या विरोधात हल्ला करण्यासाठी तयार करणे हा आहे. कंपनीच्या मते मोठ्या फेज ट्रायलमध्ये या व्हॅक्सीनला मर्कच्या इम्युनोथेरपीचे औषध ट्रुडा सोबत दिल्यानंतर कॅन्सर पुन्हा दुसऱ्यांदा होणे आणि शरीराच्या अन्य भागात पसरण्यापासून सुटका होते.

कॅन्सरच्या उपचाराच्या पद्धतीत बदल..

ही बातमी यासाठी देखील महत्वाची आहे की हे नवे औषधाच्या यशस्वी चाचणीची कहानी नाही तर कॅन्सरवरील इलाजाच्या पद्धतीतील बदलाची शक्यता दाखवत आहे. आता कॅन्सरचा उपचार कॅन्सरचे प्रकार आणि रुग्णाची स्थितीच्या आधारे केला जातो. परंतू मॉर्डनाची पद्धत रुग्णाच्या ट्युमरच्या खास ओळख ध्यानात घेतो. INTerpath-001 च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत 1,137 असे रुग्ण समाविष्ट होते. ज्यांना गंभीर मेलानोमा ऑपरेशनने काढला गेला आहे.

ही लस का खास मानली जात आहे ?

प्रत्येक रुग्णासाठी वेगळा उपचार :  व्हॅक्सीन रुग्णाच्या त्याच्या ट्युमरच्या जेनेटिक माहिती आधारे तयार केली जाते.

शरीराला कॅन्सरची ओळख पटवते: याचा उद्देश्य रोग-प्रतिकारक पेशींना कॅन्सरच्या पेशींना खास ओळख सांगणे हा आहे.

कॅन्सर पुन्हा परतण्यास रोखण्याचा प्रयत्न: ऑपरेशननंतर उरलेल्या एकदम छोट्या कॅन्सर पेशींना टार्गेट करण्याची आशा आहे.

कॅन्सर पसरल्यानंतरही परिणाम कारक: चाचणी शरीराच्या अन्य भागापर्यंत कॅन्सर पसरण्यापासून वाचवण्याचे लक्ष्य देखील पूर्ण झाले.

एमआरएनए तंत्राचा नवा वापर : कोविडनंतर पहिल्यांदा mRNA तंत्राने कॅन्सरच्या उपचारात एवढ्या मोठ्या टप्प्यात चाचणीत सकारात्मक परिणाम आले आहेत.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा