AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या…

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे आपल्या राज्याची बाजू मांडत राज्याच्या भल्यासाठी अनेक बाबींवर चर्चा केली आहे.

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या या दोन मोठ्या मागण्या...
CM Thalapathy Vijay to Amit Shah
| Updated on: Aug 20, 2026 | 11:06 PM
Share

CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यांनी या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे. बातमीनुसार दक्षिण झोनल काऊन्सिलमध्ये पहिल्यांदा भाग घेत असलेल्या थलपती विजय यांनी केंद्रिय गृहमंत्र्यासमोर neet परीक्षेत तामिळनाडूला सुट देण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार संघ पुनर्रचना आणि दक्षिण भारतातील राज्याचे प्रतिनिधीत्वाला सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय त्यांनी आंतर राज्यीय ड्रग्स समस्या, ब्ल्यु इकॉनॉमी आणि किनारपट्टी सुरक्षा प्रकरणात सहकार्य करण्याची मागणी देखील केंद्राकडे केली आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार नीट पेपरच्या मुद्यावर विजय यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत तामिळनाडूच्या आधीच्या सरकारच्या पावलांलवर चालत नीट प्रकरणात राज्याला सुट देण्यात यावी. त्यांनी केंद्रिय स्तरावर नीट परीक्षा घेतल्याने ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. राज्यातील मेडिकल कॉलेजात १२ वीच्या परीक्षा गुणावरच मेडिकलच्या सीटचे वाटप केले जावे असे म्हटले आहे.

तामिळनाडूच्या गेल्या सरकारमध्ये स्टॅलिन यांच्या सरकारने देखील हाच नीटचा मुद्दा लावून धरला होता. अलिकडे झालेल्या नीट घोटाळ्यानंतर तर ही मागणी अधिकच केली जात होती.

मतदार संघ पुनर्रचना विधेयकाची चिंता…

केंद्र सरकारद्वारे आणलेल्या मतदार संघ पुनर्रचना बिला संदर्भात देखली थलपती विजय यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की दक्षिण राज्यात ही वास्तविक आणि सामायिक चिंता आहे. लोकसंख्या आधारे हे विधेयक त्यांचा राजकीय आवाज कमजोर करु शकते. दक्षिणेकडील राज्ये सतत लोकसंख्या नियंत्रण, मानव विकास, आर्थिक विकासात सर्वात पुढे आहेत. त्यांचे हे काम राष्ट्रीय प्राथमिकतेच्या यशाला प्रदर्शित करते. अशात जर लोकसंख्येच्या आधारे मतदार संघ पुनर्रचना करुन त्यांचे प्रतिनिधीत्व कमी करायला नको.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा