Sai Tamhankar: अभिनयातला अ येत नसला तरी सुपरस्टार म्हणतो; अभिनेत्रीची सई ताम्हणकरसाठी केलेली पोस्ट व्हायरल
Sai Tamhankar: मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने सई ताम्हणकरचा "अडकित्ता" हा चित्रपट पाहिला आणि पोस्ट केली. पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच एका अभिनेत्रीने सईचा “अडकित्ता” हा चित्रपट पाहून पोस्ट केली आहे. ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? तिने नेमकं काय म्हटलं? चला जाणून घेऊया…
सध्या सोशल मीडियावर फु बाई फु या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री आरती सोलंकीची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. तिने आरतीचा “अडकित्ता” हा चित्रपट पाहिला आणि तिचे कौतुक करणारी एक पोस्ट केली आहे. आता आरती पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली? वाचा
काय आहे आरतीची पोस्ट?
“अडकित्ता’ सिनेमा पाहिला आणि साईचा ‘फू बाई फू’ प्रवास डोळ्यांसमोर आला. तिनं केलेल्या बोल्ड भूमिका ते अगदी सरळ साधी बाई, आयटम साँग, निवेदिका, हिंदी चित्रपट हे सगळं पाहिलं आहे…” असे आरती पोस्टमध्ये म्हणाली.
पुढे आरतीने मराठी प्रेक्षकांना चांगलेच फटकारले आहे. ती म्हणाली की, “मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत हे कळते. आपल्याला कौतुक फक्त बॉलिवूड मधल्या अभिनेत्रींचे आहे. त्यांना अभिनयातला ‘अ’ जरी येत नसला तरी आपण त्यांना सुपरस्टार म्हणतो. पण आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमधल्या मराठी अभिनेत्रींची आपल्याला मात्र किंमत नाही…
मराठी कलाकारांचे केले कौतुक
आरतीने पोस्टमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील इतर अभिनेत्रींचे तोंड भरुन कौतुक केले आहे. “मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सई ताम्हणकर , प्रिया बापट, छाया कदम, अमृता खानविलकर या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीमध्येच नाही तर बॉलिवूड सिनेमे, वेब सीरिज, मराठी नाटक ह्यांत मोलाचं काम करतायेत. खूप वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांना ही प्रसिद्धी मिळाली आहे. आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून मन मोठं करुया आणि आपल्या मराठी अभिनेत्रींना सुपरस्टार म्हणुयात…” असे ती म्हणाली. सध्या सोशल मीडियावर आरती सोलंकीची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
