AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kunickaa Sadanand: कुनिका सदानंदच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने गमावले प्राण; डोळे पाणावणारी पोस्ट

Kunickaa Sadanand: अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. कुनिका आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Kunickaa Sadanand: कुनिका सदानंदच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने गमावले प्राण; डोळे पाणावणारी पोस्ट
कुनिका सदानंदImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 9:31 AM
Share

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री कुनिका सदानंदवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुनिकाची आई कल्याणी सदानंद यांचं गोव्यात वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कुनिकाने सोशल मीडियावर आईचा जुना फोटो शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आईच्या आठवणींना उजाळा देताना तिने लिहिलेली भावूक पोस्ट सध्या चर्चेत आहे. कुनिकाने आईला केवळ जन्मदाती म्हणून नव्हे, तर आयुष्यभर मार्गदर्शन करणारी आणि आत्मविश्वास देणारी व्यक्ती म्हणून आठवलं. तिच्या पोस्टमध्ये आईबद्दलचं प्रेम आणि कृतज्ञता प्रकर्षाने जाणवते. आयुष्यात स्वप्न पाहण्याचं धाडस, जगातील आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण आईकडून मिळाल्याचं तिने सांगितलं.

कल्याणी सदानंद यांना कुनिकाने प्रेमाने ‘एम्प्रेस’ म्हणून संबोधलं. त्यांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्या आनंदी, मनमोकळ्या आणि विनोदी स्वभावाच्या होत्या, अशी आठवण तिने सांगितली. कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्यांना नेहमी हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून लक्षात ठेवतील, असंही कुनिकाने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं. आईच्या निधनानंतर लिहिलेल्या संदेशात कुनिकाने तिच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी प्रार्थना केली. आईने पत्नी, आई, बहीण, आजी अशा विविध नात्यांमध्ये आपली जबाबदारी प्रेमाने पार पाडली, असं तिने म्हटलं. आता ती आपल्या दिवंगत भावंडांना आणि जवळच्या व्यक्तींना पुन्हा भेटली असेल, अशी भावनाही कुनिकाने व्यक्त केली.

कुनिकाची पोस्ट-

गोव्यात होणार अंत्यसंस्कार

कल्याणी सदानंद यांच्यावर गोव्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यानंतर कुटुंबीयांकडून इतर धार्मिक विधी मुंबईत केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर कुनिकाच्या चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

धर्मेंद्र यांच्या मोठ्या चाहत्या होत्या कल्याणी

कल्याणी सदानंद यांचा बॉलिवूडशी आणखी एक खास संबंध होता. त्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. कुनिकाने एका जुन्या आठवणीत सांगितलं होतं की, धर्मेंद्र यांच्यासोबत शूटिंग सुरू असताना त्या आईलाही सेटवर घेऊन गेल्या होत्या. आपल्या आवडत्या अभिनेत्याला जवळून पाहण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाल्याने कल्याणी खूप आनंदी झाल्या होत्या. धर्मेंद्र यांनीही त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.

कुनिका सदानंदने हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दीर्घकाळ काम केलं आहे. ‘खिलाडी’, ‘बेटा’, ‘मोहरा’, ‘कोयला’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘पेज 3’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. ‘बिग बॉस’मधील सहभागामुळेही ती पुन्हा चर्चेत आली होती.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा