AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

टीईटीचा पेपर उद्या रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणार असतानाच आधल्या दिवशी फुटल्याने लाखो उमेदवारांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
cm devendra fadnavis
| Updated on: Jun 27, 2026 | 8:44 PM
Share

राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ ) होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. ठाण्याचे जॉईंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेत ही SIT स्थापन करण्यात येणार आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणी सरकार आता अँक्शन मोडवर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांना फोन करून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई करा आणि कुणाचीही गय करू नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचा दादा भुसे यांनाही फोन

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना ही फोन केला आहे.त्यांच्याकडून या प्रकरणातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर त्यांना सूचना केल्या आहेत. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करुन या प्रकरणातील सूत्रधारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार असे म्हटले आहे.

टीईटी परीक्षा नकोच !

उद्या रविवारी होणारा टीईटीचा पेपर फुटल्याने तो रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता ही टीईटीची परीक्षा नकोच असल्याची मागणी शिक्षक महासंघ मुंबई आणि कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. दैनंदिन अध्यापनाचा आणि टीईटी परीक्षेचा दुरान्वेही संबंध नसल्याने ही टीईटी परीक्षाच रद्द करण्याची मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.

आधीच दैनंदिन अध्यापनाबरोबरच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्याने या शैक्षणिक कामांमुळे शिक्षक त्रस्त झाले असून शिक्षकांना कोणी वालीच राहिला नाही. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात टीईटी तसेच बीएलओच्या कामांबाबत राज्यातील सर्व विधानसभेचे आमदार आणि विधान परिषद सदस्यांकडे शिक्षक महासंघाच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचेही अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा