AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी

राज्य सरकारचे भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे असे गुन्हे वारंवार होऊ नयेत यासाठी कठोरात कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी
Devendra Fadnavis and Eknath Shinde
| Updated on: Jun 27, 2026 | 6:45 PM
Share

टीईटी परीक्षा २४ तासांवर असतानाच या परीक्षेचा पेपरफुटला आहे, त्यामुळे उद्या रविवार ( दि.२८ जून) रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.या प्रकरणावरुन राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या प्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

TET पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

TET पेपरफुट प्रकरणाची सखोलपणे चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधित आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले आहे. टीईटी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आश्वस्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने नव्या तारखांना घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही.महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम करणे हे महायुती सरकारचे ध्येय असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – शिक्षक आमदार जयंत आंसगावकर

टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आंसगावकर यांनी केली आहे. टीईटी पेपर फुटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार मात्र आमदार आणि खासदार खोडाफोडीचे राजकारण करण्यामध्ये मग्न असल्याची टीका जयंत आंसगावकर यांनी केली आहे.  महाराष्ट्रातून सुमारे सात लाख परीक्षार्थी देणार होते. या सर्व उमेदवारांच्या मेहनत आणि तयारीवर पाणी फेरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर