AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावकडची सिया, एकाने मन भरलं नाही मग दुसरा नवरा, त्यानंतर तिसरा आणि आता चौथ्यासाठी तिने…

सध्या देशभरात केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयलने प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याला केतनला लोहगडावरुन ढकललं. आता असचं एक प्रकरण समोर आलं आहे. ही गावकडची सिया पण खतरनाक निघाली आहे.

गावकडची सिया, एकाने मन भरलं नाही मग दुसरा नवरा,  त्यानंतर तिसरा आणि आता चौथ्यासाठी तिने...
saroj mehra
| Updated on: Jul 03, 2026 | 9:05 AM
Share

आयुष्यात सुखी आणि आनंदी राहण्यासाठी माणसाने समाधानी असणं खूप महत्वाचं असतं. काही लोकांकडे सगळं असून पण समाधान नसतं. त्यांच्या मनाला सतत कसली तरी रुखरुख लागलेली असते. ते सतत नव्याच्या मागे पळत असतात. त्यातून दु:ख, हताशा, चिडचिड वाटयाला येते. असंतुष्टता त्यांच्या बोलण्यातून प्रगट होते. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात असचं विवाहाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारं प्रकरण समोर आलं आहे. एक महिलेवर प्रियकराच्या मदतीने मिळून पतीला संपवल्याचा आरोप आहे. या महिलेची आधीच तीन लग्न झालेली. तिला चौथं लग्न करायचं होतं. म्हणून तिने प्रियकराच्या मदतीने मिळून तिसऱ्या पतीला संपवलं. दोघांनी मिळून कारस्थान रचलं. पोलिसांनी या प्रकरणात महिला, तिचा प्रियकर आणि एका अन्य आरोपीला अटक केली आहे.

नरसिहंपूर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. 27 आणि 28 जूनच्या रात्री हनुमान वॉर्ड येथे राहणाऱ्या सरोज मेहराने प्रियकर महेंद्र मेहरा आणि त्याचा साथीदार विष्णूच्या साथीने मिळून पती तुलीसरामला मार्गातून हटवलं. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर अनके धक्कादायक बाबी समोर आल्या. सरोज मेहराचं पहिलं लग्न वर्ष 2004 मध्ये झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. पहिल्या पती सोबत बिनसल्यानंतर तिने दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर वर्ष 2006 मध्ये तिने तुलसीराम बरोबर तिसरं लग्न केलं. याच दरम्यान तिचे महेंद्र मेहरासोबत प्रेमसंबंध सुरु झाले. सरोजला आता महेंद्र सोबत चौथं लग्न करायचं होतं. म्हणून दोघांनी मिळून तुलसीरामला मार्गातून हटवलं, असं पोलिसांनी सांगितलं.

प्रियकराला मला मिळवायचं होतं

आरोपी सरोज मेहराचं म्हणणं आहे की ती निर्दोष आहे. प्रियकराला मला मिळवायचं होतं, म्हणून त्याने हे सर्व केलं असं तिने पोलिसांना सांगितलं. तुलसीरामला संपवलं, त्यावेळी सरोज घरात होती. तपासात मिळालेले टेक्निकल पुरावे आणि चौकशीतून तिन्ही आरोपींच कारस्थान समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पती बेपत्ता झाल्यानंतर सरोजने तीन दिवस तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली नाही किंवा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला नाही असं पोलीस अधीक्षक ऋषिकेश मीणा यांनी सांगितलं. याचवरुन पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. चौकशी आणि टेक्निकल पुराव्यांमधून या सगळ्या कारस्थानाचा घटनाक्रम समोर आला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा