AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गवत कापताना चकाकणारा तुकडा दिसला म्हणून खोदत गेली आणि..हाती लागलं कोट्यवधीच घबाड

काकतीयच्या शासकांनी वारंगल किल्ला, हजार खांबाचं मंदिर आणि युनेस्कोच्या यादीत असलेलं रामप्पा मंदिर बनवलं. हे राज्य अपार संपत्ती, सोनंनाणं, हीरे आणि महागड्या दागिन्यांसाठी ओळखलं जायचं.

गवत कापताना चकाकणारा तुकडा दिसला म्हणून खोदत गेली आणि..हाती लागलं कोट्यवधीच घबाड
Gold In Farm Field
| Updated on: Jul 02, 2026 | 1:53 PM
Share

शेतात, घराच्या अंगणात सोनं पुरुन ठेवल्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण आता प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. 24 जून रोजी एक महिला मजूर सहा एकरच्या शेतात गवत कापत होती. त्यावेळी तिला मातीत धातूचा चमकदार तुकडा चकाकताना दिसला. तिने तिथे आणखी खोदकाम केलं, तेव्हा तिला त्या जागेत सोन्याचे दागिने सापडले. त्या शेतातून जवळपास 50 तोळे सोनं मिळाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत तिथे किती तोळं सोने मिळालं, त्याची किंमत या बद्दल काहीही पृष्टी केलेली नाही. तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील एका शेतात ही घटना घडली. आता या सोन्याच्या मालकी हक्कावरुन वाद निर्माण झाला आहे.

जो त्या जमिनीचा मालक होता, त्याला ते सर्व सोनं मजुरांनी देऊन टाकलं असं ग्रामस्थांनी सांगितलं. या जमिनीची आधी जो मालक होता, त्याच्या मुलाने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ही जमीन विकण्याआधी आपल्या मालकीची होती. सध्याचा मालक आणि मजुरांनी मला कळवल्याशिवाय ते सोनं आपसात वाटून घेतलं असं आधीच्या शेत मालकाचं म्हणणं आहे.

पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चाललाय?

हे सोनं ज्या जमिनीत सापडलय ती जमीन आधी आमच्या कुटुंबाच्या मालकीची होती असं त्याने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सोनं मिळाल्याबद्दल मला काही कळवण्यात आलं नाही. मला हिस्सा दिला नाही असं आधीच्या जमीन मालकाचं म्हणणं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हे दागिने तिथे कसे सापडले आणि त्यावर खरा अधिकार कोणाचा आहे, हे आता पोलीस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. चेन्नाराओपेट मंडलमधील कोपाकुलापाडु गावचं हे प्रकरण आहे.

अपार संपत्ती, सोनंनाणं ही या राज्याची ओळख

ही बातमी पसरल्यानंतर गावातील लोक आता, जिथे सोनं सापडलं, ती जागा उत्सुक्तेपोटी पहायला जात आहेत. वारंगलच्या समृद्ध इतिहासाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वारंगल आधी ओरुगल्लू नावाने ओळखलं जायचं. काकतीय राजवंशाची इथे राजधानी होती. 12 व्या आणि 14 व्या शताब्दीत तेलुगु क्षेत्राच्या मोठ्या भागावर त्यांनी शासन केलं. काकतीयच्या शासकांनी वारंगल किल्ला, हजार खांबाचं मंदिर आणि युनेस्कोच्या यादीत असलेलं रामप्पा मंदिर बनवलं. हे राज्य अपार संपत्ती, सोनंनाणं, हीरे आणि महागड्या दागिन्यांसाठी ओळखलं जायचं.

Follow Us
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी खळबळ! PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन,
LIVE Video | PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, प्रियांका गांधी तर थेट मांडी घालूनच बसल्या
सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
Amit Thackeray | सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय? अमित ठाकरे यांचा सरकारला संतप्त सवाल
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील...
पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना... जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं
राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?.

मोठी बातमी! शरद पवार जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंची घेतली भेट, पहिली प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात.

उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार, मोदी सरकार विरोधात शिवसेना मैदानात

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!.

राहुल गांधी, प्रियंका गांधी घेणार अभिजित दीपकेंची भेट, मोदींच्या निवासस्थानापुढेच ठिय्या!

3000 कोटी संपत्ती, 150 कोटी एका चित्रपटासाठी मानधन, 60 व्या वर्षी सलमान खान मनी मशिन...

3000 कोटी संपत्ती, 150 कोटी एका चित्रपटासाठी मानधन, 60 व्या वर्षी सलमान खान मनी मशिन..