AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: गॅस सिलेंडर हरवले तर कनेक्शन रद्द? किती लागणार दंड? वाचा सविस्तर

LPG Cylinder: एलपीजी सिलेंडरचा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचे सिलेंडर चोरीला गेले अथवा हरवले तर कनेक्शन रद्द होते का? दंडही भरावा लागतो का? काय आहे याविषयीचे नियम? जाणून घ्या...

LPG Cylinder: गॅस सिलेंडर हरवले तर कनेक्शन रद्द? किती लागणार दंड? वाचा सविस्तर
गॅस सिलेंडर हरवले तर कनेक्शन रद्द?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 02, 2026 | 1:47 PM
Share

LPG Cylinder Lost: एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. काल सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस किंमतीत कपात केली. व्यावसायिक गॅसची किंमत शिगेला पोहचली होती. तर घरगुती गॅसच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान कधी कधी सिलेंडर चोरीला जातो अथवा हरवतो. अशावेळी तुमचे कनेक्शन रद्द होते का? सिलेंडरचा पुरवठा थांबवला जातो का? ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो? एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर हा नियम तुम्हाला माहिती आहे का?

सिलेंडर हरवल्यावर करा हे काम

सिलेंडर हरवल्यावर गॅस कनेक्शन रद्द करण्यात येत नाही. पण तुम्हाला याविषयीची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सिलेंडर हरवला अथवा चोरीला गेल्यावर ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करणे आवश्यक असते.

सर्वात अगोदर पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार नोंदवा

तक्रार नोंदवताना सिलेंडरचा युनिक क्रमांक जरूर नोंदवा

त्यामुळे सिलेंडरची ओळख पटवणे सोपे जाते

चोरी, हरवल्याची माहिती संबंधित गॅस एजन्सीला द्या

या सर्व घटनेचा तपशील गॅस एजन्सीला सविस्तरपणे द्या

यासोबतच ग्राहकांनी काही कागदपत्रे देणे सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये

मूळ नोंदणी प्रत (original Subscription Voucher)

ज्याच्या नावे गॅस कनेक्शन आहे, ते ओळखपत्र

पोलिसांनी दिलेली FIR ची प्रत

सिलेंडर हरवल्यावर दंड

गॅस सिलेंडर हरवल्यावर काही कारणांमुळे गॅस कंपनी तुमच्याकडून दंड आकारू शकते. त्यासाठी ग्राहकाला 1 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. अर्थात सिलेंडरसोबत जर रेग्युलेटर हरवले तर मग दंडाची रक्कम वाढू शकते. गॅस एजन्सी याविषयीच्या नियमानुसार दंडाची रक्कम अथवा अमानत रक्कम जमा करू शकते.

नवीन सिलेंडर कसे मिळणार?

तुम्ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे जमा केल्यानंतर गॅस एजन्सी त्याची तपासणी करेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, दंड अथवा अनामत रक्कम जमा झाल्यावर गॅस एजन्सी तुम्हाला नवीन सिलेंडर देईल. त्यासाठी एक निश्चित कालावधी लागेल. त्यानंतर तुम्हाला नवीन सिलेंडर मिळेल.  त्यामुळे गॅस सिलेंडर बाहेर घेऊन जात असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ