AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक

धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक

| Updated on: Jul 02, 2026 | 12:42 PM
Share

चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन महिला नेत्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान या दोन्ही महिलांची या रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने सध्या दोन्ही आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मे महिन्यात स्वतःच्या दोन मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला होता. यानंतर आणखी तपास करताना 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची विक्री करण्याच्या तयारीत तिची आई असल्याचे समोर आले. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली होती.

या प्रकरणामागे “लिव्ह इन” आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बालकांची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अजय फुलझेले, पीडित मुलीची आई आणि बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांसह एकूण अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Published on: Jul 02, 2026 12:42 PM

Follow Us