AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध, 99% लोकांना याचे परिणाम माहितीच नसतील

कुठेही फिरायला गेल्यावर आपण सर्वात आधी हॉटलची एक खोली बूक करतो. पण बूक केलेली खोली तुमच्यासाठी सेफ आहे की नाही, याची खात्री करुन घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक जण हॉटेलमध्ये प्रेवश करताच लाईट स्विच चालू करतात. पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या ...

हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध, 99% लोकांना याचे परिणाम माहितीच नसतील
| Updated on: Jul 02, 2026 | 9:29 AM
Share

फिरायला अनेकांना आवडतं. कुटुंबासोबत मित्रांसोबत आपण कायम फिरायला जात असतो. पण फिरायला जात असताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लोक जेव्हा प्रवासाला जातात, तेव्हा ते प्रामुख्याने हॉटेलमध्ये राहतात. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच जवळपास प्रत्येकजण लाईट स्विच चालू करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय तुम्हाला संकटात आणू शकते. खोलीत प्रवेश करताच लाईट चालू करण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टींची आधी तपासणी करावी, याची जाणीव फार कमी लोकांना असते.

तज्ज्ञांच्या मते, हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यावर सर्वात आधी काही क्षण दाराजवळ थांबून संपूर्ण खोलीचं बारकाईने निरीक्षण करा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे खोलीतील सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही, हे ठरवण्यास तुम्हाला मदत होईल. जर तुम्ही हॉटेल्समध्ये राहत असाल, तर खोलीत प्रवेश करताच कोणत्या गोष्टी करु नये याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या…

हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यास लाईट्स का लावू नयेत?

खोलीत अंधार असल्यास, छुप्या कॅमेऱ्याचा छोटा एलईडी किंवा लुकलुकणारा इंडिकेटर सहज दिसतो. म्हणूनच, लगेच लाईट लावण्याऐवजी, आधी खोलीची पूर्णपणे तपासणी करणं तुमच्या कुटुंबियांसाठी अधिक योग्य असेल.

त्यानंतर, खोलीतील दरवाजे, खिडक्या, कपाटे, बाथरूम, बाल्कनी आणि पलंगाखालची जागा यांची नीट तपासून घ्या. जर तुम्हाला काही संशयास्पद किंवा असामान्य आढळलं, तर त्वरित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कळवा.

तसेच, पांढऱ्या चादरींवर ढेकूण सहजपणे दिसतात, अगदी अंधारातही. खोलीत प्रवेश करताच पलंग, उश्या, चादरी, पडदे आणि फर्निचरचे कोपरे काळजीपूर्वक तपासा. जर तुम्हाला ढेकूण दिसले, तर त्वरित खोली बदलून मागून घ्या.

जेव्हा तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत काही वेळ घालवता, तेव्हा तुमचे डोळे हळूहळू त्या वातावरणाशी जुळवून घेतात; यामुळे सूक्ष्म हालचाली, सावल्या किंवा असामान्य वस्तू ओळखणं सोपं जातं. मात्र, खोलीत प्रवेश करताच जर तुम्ही लाईट्स लावल्या, तर अशा गोष्टी तुमच्या नजरेतून सुटू शकतात. म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाल, तेव्हा लाईट्स लावण्यापूर्वी त्या खोलीची नीट पाहणी करा.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती