Indian Railway News: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सूट नाहीच ! रेल्वे मंत्र्यांनी केले स्पष्ट

Indian Railway News: रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नाही, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण पैसे भरूनच प्रवास करावा लागणार आहे.

Indian Railway News: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सूट नाहीच ! रेल्वे मंत्र्यांनी केले स्पष्ट
Senior Citizen Indian Railway FareImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 2:17 PM

Indian Railway News: रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यावधी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) एक महत्वपूर्ण बातमी आहे. रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांना पूर्ण पैसे भरूनच प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर (Rail fare) सूट देण्यात येत होती. मात्र कोरोना काळात तिकीटावरील ही सूट बंद करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी ज्येष्ठ नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. आत्तापर्यंत सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणेच त्यांना प्रवासासाठी तिकीटाची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. संसदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी हे नमूद केले. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्या खेळाडूंनाही तिकीटावर कोणतीही सूट मिळणार नसल्याचे, त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कोणताही दिलासा मिळणार नाही.

1667 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागला

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाड्यात देण्यात येणारी सूट, यासंदर्भात बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, सरकार अजूनही रेल्वे भाड्याचा 50 टक्के खर्च उचलत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटावर जी सूट देण्यात येत होती, त्यामुळे सरकारला 2019-2020 साली 1667 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागला होता. तर 2018-2019 साली सरकारने 1636 कोटी रुपयांचा बोजा सहन केला.

रेल्वेची कमाई पूर्वीपेक्षा झाली कमी

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी लोकसभेत या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रवाशांना तिकीटाच्या रकमेवर सूट देणे खूप भारी पडते, ज्यामुळे रेल्वेला मोठे नुकसान सहन करावे लागत. कोरोनापूर्वी रेल्वेची जी कमाई होत होती, त्यापेक्षा आता कमाई खूप कमी झाली आहे. रेल्वे प्रवाशांना जी सूट देण्यात येते, त्यामुळे रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

रेल्वेने कमावले 1500 कोटी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर सूट देणे बंद केले होते. त्यामुळे 2020 साली रेल्वेला 1500 कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळाला. 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत 7.31 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला, त्यांना प्रवासभाड्यात कोणतीही सूट मिळाली नव्हती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.