भारतात 55 वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी परदेशी राष्ट्राध्यक्ष नसणार, ‘हे’ आहे कारण

| Updated on: Jan 15, 2021 | 1:49 AM

भारताच्या इतिहासात 55 वर्षांमध्ये पहिल्यांदाच यावर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत परदेशी राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून नसणार आहे.

भारतात 55 वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी परदेशी राष्ट्राध्यक्ष नसणार, हे आहे कारण
Follow us on

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात 55 वर्षांमध्ये पहिल्यांदाच यावर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत परदेशी राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून नसणार आहे. कोविड-19 संसर्गामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला (No foreign head of state as republic day chief guest this year due to Corona pandemic).

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर आपला भारत दौराच रद्द केलाय. त्यामुळे ते प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणार नाही. मोदी सरकारने जॉन्सन यांना यंदा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करत भारतात येऊ शकणार नाही यासाठी खेद व्यक्त केला होता. जॉन्सन म्हणाले, “ज्या वेगाना ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतोय त्याचा विचार करता त्यांचं ब्रिटनमध्ये असणं आवश्यक आहे.”

बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केल्यानंतर त्यांच्या जागेवर सूरीनामचे भारतीय वंशाचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी 26 जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. विशेष म्हणजे केंद्र सरकारने सूरीनामच्या अध्यक्षांना आमंत्रण दिल्याची आणि त्यांनी ते स्वीकारल्याचीही चर्चा होती. मात्र, सरकारकडून आज दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये बांगलादेशचे 122 जवान सहभागी होणार

50 वर्षांपूर्वी भारताच्या समपदस्थ अधिकाऱ्यांसोबत लढणारे बांगलादेश सशस्त्र दलाचे 122 जवान दिल्लीतील प्रजासत्ताक परेडमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय उच्चायुक्तांनी एक प्रेस नोट देत याबाबत माहिती दिली. परदेशी जवानांचा भारतातील प्रजासत्ताक परेडमध्ये सहभाग घेण्याची ही इतिहासातील तिसरी घटना आहे. याआधी फ्रांस आणि यूएईच्या जवानांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा :

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेडमध्ये बांग्लादेशचे जवान सहभागी होणार

राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा गजर, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा चित्ररथ झळकणार

मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

No foreign head of state as republic day chief guest this year due to Corona pandemic