मोठी बातमी! अमेरिका नाही तर हा बलाढ्य देश करणार इराणवर पहिला हल्ला, आता कोणत्याही क्षणी थेट..

अमेरिकेनं इराणवर हल्ल्याची संपूर्ण तयारी केली आहे, मध्य पूर्वेत दोन बलाढ्य युद्ध नौका अमेरिकेकडून तैनात करण्यात आल्या आहेत, तसेच सैन्यबळ देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! अमेरिका नाही तर हा बलाढ्य देश करणार इराणवर पहिला हल्ला, आता कोणत्याही क्षणी थेट..
khamenei, trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 5:09 PM

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढतच आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणला धमकावत आहेत. अमेरिकेकडून इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ल्याची तयारी म्हणून यापूर्वीच आपल्या दोन सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्ध नौका मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये, आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही अमेरिकेला जशास तसं उत्तर देऊ अशी धमकी इराणकडून देण्यात आली आहे. तसेच इराणला रशिया आणि चीनची मजबूत साथ मिळताना दिसत आहे, इराणवर हल्ला झाला तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील, इराणवर हल्ला म्हणजे आगेसोबत खेळणं आहे, अशी धमकी काही दिवसांपूर्वीच रशियानं अमेरिकेला दिली होती, तर त्यानंतर आता चीनने देखील अमेरिकेला थेट धमकी दिली आहे, इराणवर हल्ला केला तर त्याचे वाईट परिणाम होतील असं चीनने म्हटलं आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार इराणवर पहिला हल्ला इस्रायलने करावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेला इराणवर हल्ला करायचा आहे, मात्र अमेरिकेकडून इराणवर होणाऱ्या संभाव्य कारवाईला अमेरिकन जनतेचा पाठिंबा मिळावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. जर इराणवर इस्रायलने आधी हल्ला केला आणि त्यानंतर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर अमेरिकन सैन्याला तेथील जनतेचा पाठिंबा मिळेल, जनमत तयार होईल, असं ट्रम्प प्रशासनाला वाटत असल्याची माहिती समोर येत आहे.

राजकीय फायदा

एका रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प हे इराणवर हल्ला केल्यामुळे अमेरिकेचं राजकीय आणि आर्थिक नुकसान किती होऊ शकतं? याचा विचार करत आहेत, त्यामुळेच त्यांचा प्लान असा आहे की, जर आधी इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि समजा इराणने इस्रायला उत्तर दिलं तर अमेरिकेला इराणवर हल्ला करणं सोप जाईल आणि अमेरिकेनं केलेल्या या कारवाईला एक मास बेस देखील तयार होईल, त्यामुळे आता इस्रायल आधी इराणवर हल्ला करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us