आता महेंद्रसिंग धोनी पाळतोय बकऱ्या, कुत्रे, घोड्यानंतर घरात आले नवे पाहुणे. फॅन्स धोनीला म्हणतायेत G O A T

मीडियातील बातम्यांच्या माहितीवरुन वर्षभरापूर्वी या बकऱ्या गुजरातमधून धोनीने आणल्याची माहिती आहे. सुरुवातीला त्यांना फार्महाऊसमध्ये ठेवले नव्हते. माहीचे फक्त प्राण्यांवरच प्रेम आहे असे नाही, तर त्याला पक्षीही खूप आवडतात.

आता महेंद्रसिंग धोनी पाळतोय बकऱ्या, कुत्रे, घोड्यानंतर घरात आले नवे पाहुणे. फॅन्स धोनीला म्हणतायेत G O A T
Dhoni GOAT
Image Credit source: social media
| Updated on: Jun 13, 2022 | 10:33 PM

नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनी याला प्राणी खूप आवडतात, हे आता कुणापासून लपून राहिलेलं नाही. त्याचं हे प्राणीप्रेम आता सगळ्यांना माहिती आहे. आता तर त्याने कुत्रे, घोड्यांसब बकऱ्या पाळण्यासही सुरुवात केली आहे. महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षी धोनी हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मिसेस धोनीच्या अन्स्टाग्राम रील्समध्ये दोन बकऱ्या दिसतायेत. फार्महाऊसच्या गार्डनमध्ये या दोन्ही बकऱ्या आरामात चरताना दिसत आहेत.

गुजरातवरुन आणल्यात बकऱ्या

मीडियातील बातम्यांच्या माहितीवरुन वर्षभरापूर्वी या बकऱ्या गुजरातमधून धोनीने आणल्याची माहिती आहे. सुरुवातीला त्यांना फार्महाऊसमध्ये ठेवले नव्हते. माहीचे फक्त प्राण्यांवरच प्रेम आहे असे नाही, तर त्याला पक्षीही खूप आवडतात. माजी कॅप्टन धोनीच्या घरी एक पोपटही आहे. सोशल मीडियावर धोनीच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यात येते आहे. त्याचे फॅन्सही या नव्या पाहुण्यांमुळे आनंदले आहेत. साक्षीच्या व्हीडिओवर वेगवेगळ्या कॉमेंट्स करण्यात येत आहेत. काहींनी तर धोनीलाच G O A T असे संबोधले आहे.

G O A T चा काय आहे अर्थ

G O A T याचा अर्थ केवळ बकरी असा होत नाही, तर क्रीडा जगतात या शब्दाचा अनेकदा वापर करण्यात येतो. ज्याचा क्रीडा जगतातील अर्थ आहे, Greatest off All Time म्हणजेच सर्वकालीन महान असा आहे. धोनीला त्यामुळेच G O A T असे संबोधण्यात येते आहे. धोनी सोशल मीडियावर फारसा एक्टिव्ह नाही, मात्र त्याची पत्नी याबाबत त्याच्याविरुद्ध आहे. साक्षी सातत्याने तिचे आणि कुटुंबाचे फोटो शेअर करीत असते. त्यामुळे धोनीचे अपडेट्स त्याच्या चाहत्यांना मिळत असतात.