
भारतात दरवर्षी 1 लाख 40 हजार लोकांचे मृत्यू सर्पदंशाने होत असतात. महाराष्ट्रात सर्पदंशाने मरणाऱ्याची संख्या मोठी आहे. केनियात झालेल्या संशोधनात आता एक क्रांतीकारक शोध लागला आहे. युनिथिओल नावाचे औषध जे आधी धातु विषाक्ततेसाठी वापरले जात होते. ते आता सापाच्या विषावर उतारा म्हणून उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. ६४ लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला.त्यात यश मिळाले आहे. हे औषध बाजारात सहज उपलब्ध आहे आणि कमी तापमानातही संग्राह्य ठेवता येते.
सर्पदंशातील मृत्यू वेळीच उपचार न मिळाल्याने होत असतात. परंतू केनियात सापाच्या चावण्यावर मोठे संशोधन झाले आहे. या शोधामुळे घरातच सर्पदंशावर उपचार मिळणे शक्य होणार आहे. आतापर्यंत सर्पदंशावर एंटीव्हेनम औषध दिले जात होते. ते इंजेक्शनद्वारे देण्यात येत असते. ई-बायोमेडिसिनमध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. त्यातील एका अहवालात संशोधकांनी दावा केला आहे की युनिथिओल नामक औषध जे सापाचे विष संपवण्यास मदत करते या उपयोग मेटल पॉयझनिंगच्या उपचारातमध्ये केला जात होता.
सापांच्या विषात मेटालोप्रोटीनेज आढळते. जे पेशींना धोका पोहचवते, त्यासाठी झिंकची आवश्यकता असते. ते हे शरीरातून घेते. युनिथिओल या झिंकला मार्गातून हटवून विष पसरविण्याचा मार्ग बंद करुन टाकतो. विशेष म्हणजे हे औषध पाण्यासोबत गोळी प्रमाणे देखील खाता येते. तसेच या औषधास प्रतिकूल वातावरणातही ठेवता येते. म्हणजे हे औषध कॅप्सुलच्या फॉर्ममध्ये बाजारात पुढे मागे मिळू शकते. आतापर्यत सांपाच्या विषाला संपवणारी जेवढीही औषधं बनविली होती त्यांना साठवून ठेवण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते. जे गावाच्या ठिकाणी उपलब्ध नसते. त्यामुळे गावातील ठिकाणी सर्पदंशाने माणसे अधिक दगावतात.
केनियात 64 लोकांवर या औषधाचा प्रयोग केला गेला होता. यात या 64 लोकांना सांप चावल्यानंतर यूनिथिओल औषध देण्यात आले होते. 64 लोक लागलीच बरे झाले. त्यांत्यावर सांपाच्या विषाचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. विशेष म्हणजे या औषधांचा वापर करण्यासाठी खास तज्ज्ञ लोकांची गरज लागत नाही.या औषधाचा वापर कमी आणि जास्त विषारी सांपाच्या दंश झाल्यानंतर देखील केला जाऊ शकतो.