एकीकडे विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन तर दुसरीकडे रेल्वे भरती परीक्षेच्या नावामुळे आमची बदनामी, नाव बदला-NTPC

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) परीक्षेच्या सुरुवातीच्या टप्प्यात उमेदवारांच्या छाणनीवरून बराच वादंग सुरू असून गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थी याविरोधात आंदोलन करत आहेत.

एकीकडे विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन तर दुसरीकडे रेल्वे भरती परीक्षेच्या नावामुळे आमची बदनामी, नाव बदला-NTPC
रेल्वे परीक्षेचे नाव बदलणार?
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 6:12 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) परीक्षेबाबत विनाकारण टीकेला सामोरे जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनी NTPC ने रेल्वेला पत्र लिहिले आहे. रेल्वेच्या (Indian Railway) ‘नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC)’च्या परीक्षेचे नाव बदलण्याचे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. NTPC म्हणते की RRB-NTPC मुळे नकळत NTPC बदनाम होत आहे. एनटीपीसी (पॉवर कॉर्पोरेशन) च्या पत्रात म्हटले आहे की, एनटीपीसी लिमिटेड नकळतपणे वादात सापडली आहे. प्रसारमाध्यमे NTPC वर खापर फोडत असल्याचेही म्हटले आहे, ज्यामुळे ही परीक्षेला भारतातील सर्वात मोठ्या वीज उत्पादकाशी संबंधित असल्याचा समज होतो. यामुळे आमच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. अशा स्वरूपाचे पत्र लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता रेल्वे परीक्षेचे नाव बदलणार का? असाही सवाल उपस्थित झाला आहे.

एनटीपीसीने म्हटले आहे की, “तुमच्या प्रेस रीलिझ आणि स्टेटमेंटमध्ये रेल्वे भरती योजनेचा संपूर्ण फॉर्म वापरा जेणेकरून सोशल मीडिया वापरकर्ते आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरू नये. म्हणून आम्ही तुम्हाला या परीक्षांचे नाव बदलण्याची विनंती करत आहोत जेणेकरून भविष्यात कोणताही गोंधळ होणार नाही.” वास्तविक, NTPC रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षा हे नाव रेल्वे परीक्षेच्या संक्षिप्त नावासाठी वापरले जात आहे. तर दुसरीकडे NTPC हे नाव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनसाठी वापरले जाते. त्यामुळे हा सगळा वाद सुरू झाला आहे.

नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) उमेदवारांच्या निकालात तफावत असल्याच्या आरोपांमुळे रेल्वे भर्ती विरोधात (RRB) 24 जानेवारीपासून विरोध विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी यूपी-बिहारमध्ये रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. बिहारमध्ये अनेक ठिकाणी गाड्या जाळण्यात आल्या. रेल्वे रुळ उखडले आहेत. विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बिहारच्या खान सर यांच्यासह अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटचे मालक आणि अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनानंतर रेल्वेने परीक्षा पुढे ढकलून संतप्त विद्यार्थ्यांचा रोष दूर करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती RRB NTPC परीक्षेच्या निकालातील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करेल.

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

Martyrs Day : बापूंचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करणं हाच सामुदायिक प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महात्मा गांधींना अभिवादन

भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करा; प्रयागराज धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर