हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा
Omar Abdullah : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात एका मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनासाठी पोहोचताना त्यांची चक्क ऑटोतून प्रवास केला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

राजधानी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातील लोक सहभागी झाले आहे. आज अभिजीत दिपके यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनासाठी उमर अब्दुल्ला चक्क ऑटोने पोहोचले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या साधेपणाचे कौतुक होत आहे.
आंदोलनात सहभागी होण्यासाठी उमर अब्दुल्ला यांचा ऑटोने प्रवास
जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी ऑटो-रिक्षाने आंदोलनस्थळी पोहोचत आंदोलनात सहभाग घेतला. या प्रवासाचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांचा हातात एक होर्डिंग दिसत आहे. या आंदोलनात उमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी केली.
जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी
केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. आता उमर अब्दुल्ला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करत आहेत. आज त्यांनी दिल्लीत त्यांनी जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या आंदोलनाचे नेतृत्व करत केंद्र सरकारकडे राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
My walk from Jantar Mantar was about to turn into another procession so we grabbed the first available means of transport 🛺. pic.twitter.com/R8mtp3hk5X
— Omar Abdullah (@OmarAbdullah) July 20, 2026
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल
हा व्हिडिओ शेअर करताना उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘जंतर-मंतरकडे माझी पायी यात्रा आणखी एका मोर्चात रूपांतरित होणार होती. त्यामुळे जे पहिले वाहन मिळाले, त्यात बसून आम्ही मोर्चाच्या ठिकाणी गेलो.’ ओमर अब्दुल्ला यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी दुर्दैवी बाब
जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी म्हणाले की, ‘आज आम्हाला आंदोलन करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी दिल्लीत यावे लागत आहे, ही जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी दुर्दैवी बाब आहे.’