Operation Sindoor : हळूहळू खरी माहिती समोर येतेय, पाकिस्तान एअर फोर्सच महाभयंकर नुकसान, अधिकाऱ्यांसह 50 ठार

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य दलांनी जी कारवाई केली, त्यात पाकिस्तानच मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान ही सर्व माहिती आंतरराष्ट्रीय मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या देशातील गरीब जनतेला खोटी माहिती सांगून दिशाभूल करत आहे. खरंतर पाकिस्तानी सैन्याला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. पण आता हळूहळू खरी माहिती समोर येऊ लागली आहे.

Operation Sindoor : हळूहळू खरी माहिती समोर येतेय, पाकिस्तान एअर फोर्सच महाभयंकर नुकसान, अधिकाऱ्यांसह 50 ठार
Pakistan loss its Assets
Image Credit source: Defence sources via PTI Photo
| Updated on: May 14, 2025 | 8:04 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये घुसून फक्त दहशतवादी तळांवर कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई आपल्यावरचा हल्ला मानून भारतावर प्रतिहल्ल्याची चूक केली. त्याची मोठी किंमत पाकिस्तान लष्कर आणि पाकिस्तान एअर फोर्सला चुकवावी लागली आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेपासून सत्य लपवून तिथे विजयाचे खोटे ढोल बडवले जात आहेत. पाकिस्तानात किती नुकसान झालय, त्याची आता हळूहळू खरी माहिती समोर येऊ लागली आहे. पाकिस्तानने 7-8 तारखेच्या रात्री 15 आणि 8-9 तारखेच्या रात्री भारताच्या 26 शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वसामान्य भारतीय नागरिकांसोबत सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सर्तक असलेल्या भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानचे हे दोन्ही हल्ले यशस्वी रित्या परवतून लावलेच.

पण त्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवणारी कारवाई केली. 7 ते 10 तारखेदरम्यान भारतीय सैन्य दलांनी जो पराक्रम दाखवला, तो पुढची काही वर्ष पाकिस्तान निश्चित विसरणार नाही. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच किती नुकसान झालय, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे. भारताने अत्यंत अचूकतेने पाकिस्तानातील जवळपास डझनभर हवाई तळांवर हल्ला चढवला. यात पाकिस्तान एअर फोर्सच महाभयंकर नुकसान झालं आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअर फोर्सचं 20 टक्के इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झालं. यात अनेक पाकिस्तानी फायटर विमान सुद्धा आहेत. अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय.

वास्तवात हा आकडा मोठा

पाकिस्तानच्या सरगोधा आणि भोलारी एअर बेसवर त्यांची F-16 आणि J-17 विमानं तैनात असतात. भारताने पाकिस्तानच्या या दोन्ही एअर बेसच मोठ्या प्रमाणात नुकसान केलय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने सध्या त्यांचे 11 सैनिक ठार झाल्याच कबूल केलय. पण वास्तवात हा आकडा मोठा आहे. पाकिस्तानी सैन्य दलांशी संबंधित जवळपास 50 जण या कारवाईत मारले गेले आहेत. यात अधिकारी सुद्धा आहेत. सिंध प्रांतातील जामशोरे येथे असलेल्या भोलारी एअर बेसवरील कारवाईत स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ आणि चार एअरमेन मारले गेलेत. पाकिस्तानची अनेक फायटर विमानं या कारवाईत नष्ट झाली आहेत.

पाकिस्तानच्या सैन्य चौक्या पूर्णपणे नष्ट

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रतिहल्ल्याची ही कारवाई करण्यात आली. चकालामधील नूर खान, शोरकोटमधील रफिकी, चकवालमधील मुरीद, सुक्कूर, सियालकोट, पसरुर, च्युनियन, सरगोदा, स्कार्दू, भोलारी आणि जाकोबाबाद या एअर बेसेसवर हा हल्ला करण्यात आला. सॅटलाइट फोटोंवरुन जाकोबाबादच्या शाहबाज एअर बेसवर किती मोठं नुकसान झालय ते सॅटलाइट फोटोंवरुन स्पष्ट झालाय. नियंत्रण रेषा LOC वर दहशतवाद्यांना लपवण्यासाठी बनवलेले बंकर्स आणि पाकिस्तानच्या सैन्य चौक्या पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. पाकिस्तान सैन्य आणि एअर फोर्स मिळून त्यांचे जवळपास 50 जण ठार झाले आहेत.