Operation Sindoor : बदला नव्हे, न्याय होता.. भारताने पाकड्यांच्या चौक्या अशा केल्या उद्ध्वस्त, Video

भारतीय लष्कराने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता असं उत्तर देऊ की यांच्या पिढ्यान् पिढ्या हे लक्षात ठेवतील, असा मेसेज एका सैनिकाने त्यात दिल्याचे दिसते.

Operation Sindoor : बदला नव्हे, न्याय होता.. भारताने पाकड्यांच्या चौक्या अशा केल्या उद्ध्वस्त, Video
ऑपरेशन सिंदूरचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 18, 2025 | 12:56 PM

पहलगाम हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र त्यामुळे चवताळलेल्या पाकड्यांनी भारतावर हल्ला केला, ज्याला आपण चोख उत्तर दिलं. त्यांचा गोळीबारही रोखला. जेव्हा पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन केले जात होते, तेव्हा भारतीय चौक्या तसेच निवासी भागांनाही लक्ष्य केले जात होते. भारतीय सैन्याने शत्रूला म्हणजेच पाकिस्तानला कसे चोख प्रत्युत्तर दिले ते आता स्पष्ट दिसणार आहे. त्याचा व्हिडिओ भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये, भारतीय सैन्याने जम्मू सेक्टरच्या समोरील पाकिस्तानमधील पाकिस्तानी चौक्या आणि टॉवर उद्ध्वस्त केल्याचे दिसून येतं.

भारतीय सैन्याकडून व्हिडीो जारी करण्यात आला आहे. हे सर्व पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाले. तो राग नव्हे ज्वालामुखी होता, असं व्हिडिओमध्ये एका लष्करी जवानाने म्हटलं. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की यावेळी आम्ही असं उत्तर देऊन की त्यांच्या येणाऱ्या कैक पिढ्या ते लक्षात ठेवतील. हा सूड नव्हे तर न्याय होता, असं व्हिडीओमध्ये सैन्याच्या आणखी एका जवानाने म्हटलं. 9 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास शत्रू सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले.

 

 

योग्यवेळी जगाला दाखवू संपूर्ण फिल्म

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी गुजरातमधील भूज रुद्र माता हवाई दल तळाला भेट दिली. भारताचं ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, असं सांगत त्यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही संपूर्ण चित्रपट जगाला दाखवू,असं राजनाथ सिंह म्हणाले.

भारत पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असे ते इस्लामाबादला कडक इशारा देताना म्हणाले. आम्ही पाकिस्तानचे वर्तन सुधारेल की नाही हे पाहण्यासाठी त्याला प्रोबेशनवर ठेवले आहे,असेही सिंह यांनी नमूद केलं.

शांततेच्या नावाखाली भारत आपले मन मोकळे करण्याची तयारी जगाने पाहिली आहे, परंतु शांतता नष्ट करू इच्छिणाऱ्यांना भारत कसा प्रतिसाद देतो हे देखील पाहिले जाईल,असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला दिला .

दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला, भारतीय लष्कराचे पश्चिम कमांड कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी जम्मू प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक ठिकाणी भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैन्याच्या अचूक आणि दंडात्मक प्रतिसादाचे कौतुक केले.