
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदुर’द्वारे जशास तसा बदला घेतला आहे. आता या ऑपरेशनमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहरचे कुटुंब मारले गेल्याची माहिती समोर येत आहेत. मात्र, मसूद जीवंत आहे की त्याचा देखील मृत्यू झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्लात जवळपास 25 हिंदू शहीद झाले. त्यानंतर आता 15 दिवसानंतर भारताने पाकिस्तानचा चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात भारताचा सर्वात मोठा दहशतवादी शत्रू मसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब ठार झाले आहे.
मसूद अजहरचे कुटुंब ठार
बहावलपूर हे मसूद अझहरचा गड आहे. तसेच जैश-ए-मोहम्मदचे सर्वात सक्रिय तळ आहे. पठानकोट व पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार इथून सक्रिय होते. इथे मदरसे, प्रशिक्षण केंद्रे आणि भरती मोहीम मोठ्या प्रमाणावर चालते. त्यामुळे भारताने येथ एअर स्ट्राईक केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अहरचा भाऊ रऊफ असगर ठार झाला आहे. या हल्ल्यात त्याच्या बहिणीचाही मृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लष्कर-ए-तोएबचे ५ कमांडर ठार झाले आहेत. हाफिज मलिक, मुदस्सीर, वकास, हसन अशी त्यांची नावे आहेत. मात्र, मसूद अहर जीवंत आहे की मारला गेला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: पाकिस्तानला पाठिंबा देत ‘हे’ इस्लाम देश एकवटले, भारताला धमकी देत म्हणाले…
कुठे कुठे झाला हल्ला?
भारताने पाकिस्तान अधिकृत जम्मू-कश्मीरमधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपुर, बिंबर आणि सियालकोट, चक अमरू, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यापैकी काही ठिकाणे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय, हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र, दहशतवादी प्रक्षेपण स्थळ, सीमेवरचा दहशतीचा अड्डा असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात आनंद साजरा केला जात आहे. भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत.