विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सर्व घडामोडी पाहात आज दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?
लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 4:40 PM

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सर्व घडामोडी पाहात आज दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे, आणि याचे पडसाद अधिवेशनाच्या कामकाजावर उमटल्याचं पहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. विरोधकांनी सरकारला घेरलं, सुरुवातीला लोकसभेचं कामकाज सहा वेळा तर राज्यसभेच कामकाज 5 वेळा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर मात्र लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

आंदोलक आक्रमक   

दरम्यान दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला आहे. संसद भवन परिसरात मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी बॅडीकेड लावण्यात आले होते. परंतु आंदोलकांनी बॅडिकेड पार करून संसद भवन परिसरात प्रवेश केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा केला. तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला. त्यामुळे आंदोलक आधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

संजय राऊत यांचा टोला 

दरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना टोला लगावला आहे, त्यांनी ट्विट करत सरन्यायाधीश यांचे आभार मानले आहेत. या सर्व आंदोलनाचं श्रेय एका माणसाला जातं, सूर्यकांतजी धन्यवाद, चळवळीमध्ये जीव फुंकला असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवस्ते सैरव दास यांनी याबाबत दावा केला आहे. अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आता विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं, विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

 

Follow Us