Pahalgam Attack : पाकिस्तानचा बीपी वाढला, पहिल्यांदाच भारताचा जिगरी दोस्त थेट काश्मिरात; आता काही तरी मोठं घडणार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी तोडलं आहे. त्यामुळे पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं ढग निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे काश्मिरमध्ये भारताचा सर्वात विश्वासू मित्र दाखल झाल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे. त्यामुळेही पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

Pahalgam Attack : पाकिस्तानचा बीपी वाढला, पहिल्यांदाच भारताचा जिगरी दोस्त थेट काश्मिरात; आता काही तरी मोठं घडणार?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 26, 2025 | 11:13 AM

Pahalgam Attack : पाकिस्तानसाठी धोक्याची डबल घंटी वाजली आहे. शहबाज शरीफ आणि आर्मी चीफ असीम मुनीर आता स्वत:लाच दोष देत असतील. हे आता पाकिस्तानी मीडियाच बोलत आहे. कारण भारताचा जिगरी दोस्त काश्मीरमध्ये पोहोचला आहे. भारताला प्रत्येक क्षणी साथ देणारा हा दोस्त आहे. हा दोस्त दुसरा तिसरा कोणी नसून इस्रायल आहे. इस्रायलचे अधिकारी काश्मिरात आल्याच्या वृत्ताला भारत सरकारकडून कोणताही दुजोरा दिलेला नाही. पण पाकिस्तानी मीडियातच तशा बातम्या सुरू आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं तोंडचं पाणी पळालं आहे.

पाकिस्तानी वेबसाईट समा टीव्हीने काल सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली होती. या बातमीनुसार इस्रायलचे 15-20 अधिकारी काश्मिरात पोहोचले आहेत. त्यांच्याकडे आधुनिक उपकरणं आहेत. यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. तिकडे अमेरिकेनेही पहलगामवरून भारताला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी निरपराध लोकांची हत्या केली, त्यांना शोधण्यात आम्ही भारताला मदत करणार आहोत, असं अमेरिकेने स्पष्ट केल्याने पाकिस्तानची तंतरली आहे.

इस्रायली शैलीची रणनीती

इस्रायलचे अधिकारी काश्मिरात पोहोचल्याने या भागात आता अडचणी वाढू शकतात याची भीती पाकिस्तानला वाटत आहे. समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी मोदी सरकारने इस्रायली शैलीची रणनीती स्वीकारली आहे. तसेच इस्रायलच्या अधिकाऱ्यांचा वापर गुप्त अभियानात मदत करण्यासाठी करून घेतला जाणार आहे. म्हणजे भारताने अजून युद्धाचा अवाक्षरही काढला नाही, पण तरीही पाकिस्तानला दिवसाढवळ्या घामटा फुटला आहे.

पाण्यावाचून तडफडणार

दरम्यान, भारताने पाकिस्तानचं हुक्कापाणी बंद करण्याचा पूर्ण प्लान तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शुक्रवारी जल सिंधु करार स्थगित करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली. यावेळी जलशक्ती मंत्री सीआर पाटील आणि अमित शाह यांच्यात 45 मिनिटे चर्चा झाली. पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यासाठीवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत पाणी तोडण्याच्या तीन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. एक म्हणजे अल्पकालिक, मध्यकालिक आणि दीर्घकालिक… या तीन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही जाऊ नये यावर सरकार विचार करत आहे.