आम्ही जीवंत आहोत; पहलगाम हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांचा तो व्हिडीओ फेक! काय आहे सत्य?

नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ फेक असल्याचे समोर आले आहे.

आम्ही जीवंत आहोत; पहलगाम हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांचा तो व्हिडीओ फेक! काय आहे सत्य?
Vinay Narwal Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 24, 2025 | 3:54 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पत्नीसोबत ‘झोल’ या पाकिस्तानी गाण्यावर रील दिसत आहेत. पण आता हा व्हिडीओ त्यांचा नसल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियावर विनय नरवाल यांचा व्हिडीओ पाहून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली होती. त्यांचे मृत्यूपूर्वीचे आनंदी क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. पण व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  सोशल मीडियावर एका कपलने दावा केला आहे की ते या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आणि कोणी तरी चुकीची माहिती देत व्हिडीओमध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल असल्याचे म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये एक कपल बोलत आहे की ते जीवंत आहे. ‘आम्ही जीवंत आहोत कारण आम्ही त्या घटनेच्या वेळी तेथे नव्हतो. मला माहिती नाही कसं पण आमचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. माझा नवरा नौदल अधिकारी विनय नरवाल आहे आणि मी त्याची बायको असल्याचे म्हटले जात आहे. टेकनीकली आमचा हा व्हिडीओ फक्त व्हायरल झाला आहे. तो कुठून आणि कसा व्हायरल झाला आम्हाला माहिती नाही’ असे व्हिडीओमधील महिला बोलताना दिसत आहेत.

वाचा: दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला, प्रश्न विचारताच केले दुर्लक्ष

पुढे ती म्हणाली की, ‘आम्ही सकाळपासून खूप त्रासात आहोत. मला, माझ्या नवऱ्याला, कुटुंबीयांना सर्वांना सतत फोन येत आहेत. आम्ही दोघेही शहीद झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना श्रद्धांजली वाहतो. पण व्हिडीओमध्ये दिसणारे आम्ही, जीवंत आहोत. ज्यांच्यासोबत हे घडले आहे त्यांच्याविषयी विचार करा. त्यांना कसे वाटत असेल. घटना त्यांच्यासोबत घडली आहे आणि व्हिडीओमध्ये आम्ही दोघे दिसत आहोत. आम्ही दोघेही जीवंत आहोत. तुम्ही जीवंत माणसाला सांगत आहात की तुम्ही मेलात. प्लीज हे रिपोर्ट करा.’

काय आहे व्हिडीओ?

जन्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल शहीद झाले. शहीद होण्यापूर्वीचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे म्हटले जात होते. या व्हिडीओमध्ये कपल रिल बनवत असल्याचे दिसत आहे. पण आता हा व्हिडीओ त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारे कपल हे जीवंत आहे.