Pahalgam Terror Attack: ‘आता घरात घुसून मारा…’, पहलगाम दहशदवादी हल्ला, सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशदवादी हल्ला, सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया... 'अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे निव्वळ क्रूरता... तर अन्य एक सेलिब्रिटी म्हणतायेत, 'आता घरात घुसून मारा'

Pahalgam Terror Attack: आता घरात घुसून मारा...,   पहलगाम दहशदवादी हल्ला, सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया
| Updated on: Apr 23, 2025 | 8:50 AM

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशदवादी हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. मंगळावारी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 20 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर सेलिब्रिटींच्या देखील संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘आता घरात घुसून मारा…’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं आहे.

पहलगाममधील दहशदवादी हल्ल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे फेसबूकवर पोस्ट करत म्हणाले ‘आता घरात घुसून मारा. एकालाही सोडू नका अमित शहा व मोदीजी…’ एवढंच नाही तर, अभिनेता संजय दत्त, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

अभिनेता अक्षय कुमार ट्विट करत म्हणाला, ‘पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मन हेलावून गेले. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे निव्वळ क्रूरता आहे. मी पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करतो.’

 

 

 

 

सांगायचं झालं तर, पहलगाम हत्याकांडात अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सीआरपीएफची क्विक अॅक्शन टास्क फोर्स देखील दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.