तिन्ही दल सज्ज! राजनाथ सिंह ‘स्पेशल’ मेसेजसह मोदींच्या भेटीला; युद्धाचा भडका उडणार?

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पाकिस्तानवर कठोर निर्बंध घातले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारताविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

तिन्ही दल सज्ज! राजनाथ सिंह स्पेशल मेसेजसह मोदींच्या भेटीला; युद्धाचा भडका उडणार?
narendra modi and rajnath singh
| Updated on: Apr 28, 2025 | 8:17 PM

Pahalgam Terro Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानमंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या हल्ल्याचे जशात तसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पाकिस्तानवर कठोर निर्बंध घातले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारताविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर महत्त्वाची चर्चा झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या तयारीची मोदी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताची भूदल, नौदल आणि वायूदल अशी तिन्ही दलं सज्ज आहेत, असं राजनाथ सिंह यांनी मोदी यांना सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलेलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार का?

भारताने आपली तिन्ही दलं सज्ज ठेवली आहेत. या तिन्ही दलांकडून आपापल्या पद्धतीने युद्धाभ्यास केला जातोय. दुसरकीडे भारत-पाकिस्तान सीमेवरही गस्त आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानने काही कुरापत्या केल्याच तर त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने तयारी ठेवली आहे. भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. सध्यातरी भारताने सबुरीची भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने काही दगाबाजी केलीच तर युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

तीन दहशतवादी पाकिस्तानमधील

मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या एकूण दहशतवाद्यांत तीन दहशतवादी हे पाकिस्तानातील आहेत. त्यातील एक दहशतवादी हा स्थानिक आहे. या सर्वांचाच भारतीय सैन्याकडून शोध घेतला जात आहे.

22 एप्रिल रोजी काय घडलं होतं?

दरम्यान, 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या दहशतवाद्यांवर अचानकपणे गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये एकूण 26 लोकांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश होता.