Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठी अपडेट! दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला अटक, तपासाला वेग येणार

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसूफ कटारिया असं या व्यक्तीचं नाव असून तो लष्कर-ए-तैयबा (TRF) चा सक्रिय सदस्य आहे.

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठी अपडेट! दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला अटक, तपासाला वेग येणार
Pahalgam-Terror-Attack-3
| Updated on: Sep 24, 2025 | 7:00 PM

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता याबाबत जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसूफ कटारिया असं या व्यक्तीचं नाव असून तो लष्कर-ए-तैयबा (TRF) चा सक्रिय सदस्य आहे. कटारियाच्या अटकेनंतर आता त्याची सखोल चौकशी केला जाणार आहे, ज्यातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या तपासात मोहम्मद युसूफ कटारियाने दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचे आणि हल्ल्यांची योजना आखण्यात मदत केल्याचे समोर आले होते. मात्र तो हल्ल्यात थेट सहभागी नव्हता. पोलिस त्याचा शोध घेत होते. आता श्रीनगर पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ब्रिनल-लामा परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. कटारिया हा कुलगाममधील एका जमातीतील व्यक्ती आहे. जो डोंगराळ भागात राहतो. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी या भागात नेहमी सक्रिय असतात.

या अटकेबाबत बोलताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, कटारियाचा माग काढण्यासाठी उलट तपास करण्यात आला. तपास पथकाने मोठ्या कसरतीने विविध संकेतांचे विश्लेषण केले आणि त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात कटारियाने दहशतवाद्यांना शस्त्रे, राशन आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले असल्याचे समोर आले आहे. आता या अटकेमुळे या हल्ल्याबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

एप्रिलमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. धर्म विचारून या पर्यंटकांवर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानची टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) दहशतवादी संघटनेचा सहभाग आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला, तसेच या घटनेमुळे दोन्ही देशातील वातावरण आणखी तणावपूर्ण बनले आहे.

या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर मध्ये हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारताने पाकिस्तानमधील अनेक शहरांमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतीय हवाई हल्ल्यात अनेक पाकिस्तानी हवाई तळ देखील उद्ध्वस्त झाले असल्याची माहिती समोर आली होती. तसेच भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडला आहे.