Pahalgam Terrorist Attack : भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर कोण जिंकणार? AI च्या उत्तराने तुम्हाला बसेल धक्का

India-Pakistan War AI : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये केव्हा युद्धाचा भडका उडेल याविषयी पाकिस्तानमध्येच अधिक चर्चा होत आहे. पाकिस्तानचे नेते आणि मंत्री रात्रंदिवस बरळत सुटले आहेत. पण युद्ध झाल्यास जिंकणार कोण? AI चं उत्तर काय?

Pahalgam Terrorist Attack : भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर कोण जिंकणार? AI च्या उत्तराने तुम्हाला बसेल धक्का
भारत-पाकिस्तान युद्ध
Image Credit source: गुगल
| Updated on: May 01, 2025 | 3:44 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे मंत्री, संत्री तर युद्धाची तारीख, ठिकाण सांगून मोकळे झाले आहेत. जसं काही त्यांना विचारूनच युद्ध होणार आहे. पण दोन्ही देशात युद्ध झाले तर कोण जिंकणार? असा सवाल विचारण्यात येत आहे. हाच प्रश्न Gemini AI ला विचारण्यात आला असता, त्याचे उत्तर धक्कादायक आले.Gemini AI ने या प्रश्नाला बगल दिली की दुसरंच काही सांगितले याविषयी लोकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

युद्धाचे ढग जमा

22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला. त्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला. पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. दहशतवाद्यांचे पाक लष्कराशी असलेले कनेक्शन सुद्धा उघड झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील दोषींना कडक शिक्षा करण्याचे जाहीर केले आहे. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने या हल्ल्यात सहभाग नसल्याचे रडकथा मांडली. तेव्हापासून दोन्ही देशात युद्ध होणार अशी चर्चा होत आहे.

Gemini AI चे म्हणणे काय?

जेमिनी एआयने याविषयीचे उत्तर दिले आहे. या युद्धात कोण जिंकेल याचे थेट उत्तर एआय देत नाही. पण भारताची बाजू उजवी असल्याचे जेमिनी सांगायला विसरत नाही. भारत पारंपारिक सैन्य शक्तीत पाकिस्तानपेक्षा अत्यंत पुढे असल्याचे हे एआय सांगते. तर पाकिस्तान सुद्धा अणवस्त्र सज्ज असल्याची आठवण करून देते. दोन्ही देशांनी विघातक आणि अणवस्त्रांचा वापर केला तर दोन्ही देशांचे मोठे नुकसान होईल असे एआय सुचवते. दोन्ही देशांनी वादावर चर्चा करून तो सोडावावा असे मत जेमिनी एआयने मांडले आहे.

संरक्षणावर भारताचा मोठा खर्च

भारताने संरक्षणावरील खर्चासाठी अर्थसंकल्पात 2025-26 साठी 6.8 लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही रक्कम 9.5% पेक्षा अधिक आहे. पाकिस्तानने संरक्षणासाठी अर्थसंकल्पात 2,281 अब्ज रुपयांची तरतूद केली आहे. त्यांनी गेल्यावर्षीपेक्षा या खर्चात 159 अब्ज रुपयांची वाढ केली आहे.

कुणाकडे अधिक सैनिक

सैनिकांची संख्या पाहता भारताकडे 14.55 लाख सक्रिय सैनिक आहेत. तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या 11.55 लाखांच्या जवळपास आहे. पाकिस्तानकडे तुलनेने केवळ 6.54 सक्रिय सैनिक आहेत आणि राखीव सैनिकांची तुकडी 5.5 लाख इतकी आहे.

भारताकडे अर्धसैनिकांची संख्या जवळपास 25.27 लाखांच्या जवळपास आहे. तर पाकिस्तानकडे ही संख्या 5 लाख इतकीच आहे. भारताकडे संख्याच नाही तर त्यांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान पण प्रगत आहे. पाकिस्ताकडे अंदाजे 150 हून अधिक अणवस्त्र आहेत. तर भारताकडे एक व्यवस्थित न्युक्लिअर शील्ड आहे. दोन्ही देशांनी ‘No First Use’ हे धोरण स्वीकारले आहे.