भारतात वक्फ बोर्ड स्वायत्त, पाकिस्तान-बांगलादेशात वक्फ बोर्डावर कोणाचे नियंत्रण, वाचून बसेल धक्का
मुघल शासक आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुघल सम्राट अकबराने अनेक ठिकाणी वक्फला जमिनी दिल्या. यामध्ये सर्वाधिक जमीन धार्मिक स्थळांसाठी देण्यात आली. अकबरानंतर दिल्लीच्या तख्तावर आरूढ झालेल्या शाहजहान आणि औरंगजेब यांनीही दिल्ली, आग्रा आणि हैदराबाद येथील मशिदी आणि दर्ग्यांसाठी प्रचंड मालमत्ता दान केली.

Waqf Board Properties: देशात सर्वाधिक संपप्ती असलेल्यामध्ये वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे 8.72 लाख रुपयांची अचल संपत्ती होती. परंतु विविध रिपोर्टनुसार वक्फ बोर्डाकडे एकूण 9.4 लाख रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्तीत मशीद, मदरसे, कब्रस्तान इतर धार्मिक जागा आहे. भारतात वक्फ संपत्तीचे दान मुस्लीम शासक, सुफी संत, व्यापारी, धार्मिक नेत्यांनी दिले आहे. भारतात वक्फ बोर्ड स्वायत्त आहे. परंतु पाकिस्तान, बांगलादेशमध्ये वक्फ बोर्ड स्वायत्त नाही.
पाकिस्तान बांगलादेशात सरकारी नियंत्रण
वक्फ बोर्ड इस्लामिक कायद्यांतर्गत विशेषतः धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी समर्पित मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार आहे. ‘वक्फ’ हा शब्द अरबी शब्द ‘वकुफा’ वरून आला आहे, ज्याचा अर्थ देवाच्या नावावर समर्पित वस्तू किंवा लोकांच्या दानासाठी दिलेला पैसा असा आहे. एकदा वक्फ म्हणून नोंद झाल्यानंतर मालमत्ता देणगीदाराकडून अल्लाहकडे हस्तांतरित केली जाते आणि ती बदलली जाऊ शकत नाही. भारतातील वक्फ व्यवस्थापन अधिक स्वायत्त आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशात त्यावर अधिक सरकारी नियंत्रण आहे. भारतात वक्फ कायदा हा अल्पसंख्याकांच्या हक्कांशी संबंधित आहे. परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तो इस्लामिक प्रशासनाचा भाग आहे.
वक्फला कोणी दिली जमीन दान
वक्फला जमीन दान देणाऱ्यात हैदराबादचे निजाम सर्वात पुढे आहे. हैदराबादमध्ये 10 निजाम झाले. त्यात पहिले मीर कमरुद्दीन खान (1724-1748) आणि शेवटचे मीर उस्मान अली खान होते. निजाम उल मुल्क आसफ जाह VII यांनी हजारो एकर जमीन वक्फला दान दिली. निजाम उस्मान अली खान यांनी यदागिरीगुट्टा मंदिर, तिरुपती मंदिर आणि अमृतसरमधील सुवर्ण मंदिरासाठीही दान दिले. दक्षिण भारतात गोलकुंडा आणि बिजापूरच्या सुलतानांनी मदरसा आणि धार्मिक संस्थानसाठी भरपूर दान दिले.
मुघल शासक आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुघल सम्राट अकबराने अनेक ठिकाणी वक्फला जमिनी दिल्या. यामध्ये सर्वाधिक जमीन धार्मिक स्थळांसाठी देण्यात आली. अकबरानंतर दिल्लीच्या तख्तावर आरूढ झालेल्या शाहजहान आणि औरंगजेब यांनीही दिल्ली, आग्रा आणि हैदराबाद येथील मशिदी आणि दर्ग्यांसाठी प्रचंड मालमत्ता दान केली.
