‘तुम्ही फक्त हिरो, देशाचे खरे हिरो मोदीजीच’, ..अन् पवन कल्याण यांनी पोस्ट केला तो फोटो

एनडीएकडून दिल्लीमध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

तुम्ही फक्त हिरो, देशाचे खरे हिरो मोदीजीच, ..अन् पवन कल्याण यांनी पोस्ट केला तो फोटो
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2025 | 6:56 PM

एनडीएकडून दिल्लीमध्ये एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान या परिषदेचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, पवन कल्याण, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दिसत आहेत.

दरम्यान या परिषदेमध्ये पवन कल्याण सहभागी झाले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांच्यासोबत जेवणही केलं. या कार्यक्रमानंतर पवन कल्याण यांनी या परिषदेमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पवन कल्याण आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना पवन कल्याण यांनी म्हटलं की, ‘आपल्या भारताचे ‘खरे हिरो’ आणि आपले प्रिय नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जेवणाचा योग आला, त्यांचं राष्ट्राप्रती असलेलं प्रेम आणि वचनबद्धता आपल्या सर्वांनासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे’ या फोटोमध्ये पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तीन उपमुख्यमंत्री दिसत आहेत. पवन कल्याण हे आंधी या नावानं देखील प्रसिद्ध आहेत, मोदी देखील त्यांचा अनेकदा आंधी असाच उल्लेख करतात.

दरम्यान याच कार्यक्रमामध्ये एक किस्सा घडला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवन कल्याण हे चित्रपटासंदर्भात चर्चा करत होते. पवन कल्याण हे हिरो आहेत. अशी चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी खरे हिरो मोदीजी आहेत, असं म्हटलं. त्यावेळी मोदी यांनी म्हटलं की काय चर्चा सुरू आहे, मला पण सांगा. त्यावर बोलताना अभिनेते पवन कल्याण यांनी म्हटलं की, शिंदेजी म्हणतात की मी हिरो आहे, मात्र देशाचे सर्वात मोठे आणि खरे हिरो मोदीजी आहेत, या प्रसंगी आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवन कल्याण यांच्यासोबत एक फोटो काढला, हाच फोटो पवन कल्याण यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला आहे.