कच्चे तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol diesel rate today : देशातील शहारातील पेट्रोल-डिझेलचे दर हाती आले आहेत. भारतात आज पेट्रोल, डिझेलसाठी सर्वाधिक पैसे हैदराबादसाठी मोजावे लागणार आहेत.

कच्चे तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?
| Updated on: Jul 02, 2026 | 8:36 AM

Fuel Price today : पश्चिम आशियातील संघर्ष कमी झाल्याने कच्च्या तेलाचा भाव घसरला आहे. कच्च्या तेलाचा भाव घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज गुरुवारी देखील कच्चे तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही शहरात इंधनाच्या दरात फरक पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरात एका इंधनाच्या एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतात, जाणून घेऊयात.

दिल्ली आणि नोएडा भागात आज गुरुवारी पेट्रोल 102.12 रुपये झालं आहे. तर डिझेलची किंमत 95.20 रुपयांवर पोहोचली आहे. तर दिल्लीजवळील नोएडामध्ये पेट्रोलसाठी नागरिकांना भाव 101. 96 रुपये मोजावे लागणार आहेत. गुडगावमध्ये पेट्रोल हे 102.97 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेल हे 95.64 रुपयांवर पोहोचलंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत इंधनाचे दर अधिकच पाहायला मिळतात. मुंबई एक लिटर पेट्रोलसाठी 111.21 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना 97.83 रुपये मोजावे लागतील.

कोलकातामध्ये आज गुरुवारी पेट्रोलचा भाव 113.51 रुपयांपर्यंत पोहोचला. डिझेलचा भाव 99.82 रुपयांपर्यंत पोहोचलाय. तर दक्षिणेतील प्रमुख शहर म्हणून ओळख असलेल्या चेन्नईत पेट्रोलची किंमत 107.77 रुपयांवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत 99.55 रुपये इतकी नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल हे हैदराबाद आणि तिरुवनंतपुरममध्ये मिळत आहे. हैदराबादमध्ये पेट्रोलचा भाव 115.69 रुपये आणि डिझेल 103.82 रुपयांवर पोहोचले आहे. तर केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये 114.80 आणि डिझेल 103.64 लीटरवर पोहोचलं आहे.

बिहार आणि राजस्थानमधील पेट्रोल-डिझेलचे दर देखील हाती आले आहेत. बिहारच्या पटनामध्ये पेट्रोल 113.69 रुपये आणि डिझेल 99.67 रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर जयपूरमध्ये पेट्रोल 113.19 रुपये आणि डिझेल 98.25 रुपये किंमतीने विक्री केली जात आहे. चंढीगडमध्ये डिझेल सर्वात स्वस्त 89.47 रुपये प्रति लीटरने विक्री केली जात आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरातील दर

नाशिक :
पेट्रोल – 111.46 रुपये , डिझेल – 99.07 रुपये

ठाणे :
पेट्रोल : 111.38 रुपये डिझेल : 98.02 रुपये

पुणे :

पेट्रोल : 111.52 रुपये, डिझेल : 98.15 रुपये

नवी मुंबई :

पेट्रोल : 111.31 रुपये , डिझेल : 97.97 रुपये

सातारा :

पेट्रोल : 112.71 रुपये , डिझेल : 99.33 रुपये

सांगली :

पेट्रोल : 111.69 रुपये, डिझेल : 98.39 रुपये

परभणी :

पेट्रोल : 113.17 रुपये डिझेल : 99.82 रुपये

 

Follow Us