AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलसाठी सरकारचा अचानक मोठा निर्णय, 1 जुलैपासून संपूर्ण देशात…आता नवा नियम लागू!

मध्य-पूर्वेत युद्धामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती हळूहळू निवळत आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर इंधन पुरवठा साखळी पूर्वपदावर येत आहे. म्हणूनच भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Petrol Diesel : पेट्रोल-डिझेलसाठी सरकारचा अचानक मोठा निर्णय, 1 जुलैपासून संपूर्ण देशात...आता नवा नियम लागू!
petrol and diesel price new ruleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 8:20 PM
Share

Petrol Diesel New Rule : आखातातील युद्धामुळे जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटल्याने भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला होता. तसेच नैसर्गिक वायू आणि इतरही इंधनाची आयात थांबली होती. त्यामुळेच देशात इंधन तुटवड्यामुळे लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकारने अनेक प्रतिबंधक नियम लागू केले होते. या नियमांमुळे सामान्यांचे हाल झाले परंतु आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच आता सरकारने पेट्रोल, डिझेलच्या वितरणाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता येत्या 1 जुलैपासून देशभरात लागू होणार आहे.

पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा हटवली

मिळालेल्या माहितीनुसार सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीबाबत एक मोठा बदल लागू केला आहे. केंद्र सरकारने मोठ्या व्यावसायिक खरेदीदारांना लागू केलेले इंधन खरेदीचे नियम आता हटवण्यात आले आहेत. याआधी व्यवासायासाठी पेट्रोल, डिझेलची खऱेदी करणाऱ्यांना पेट्रोल पंपावर इंधन खरेदी करण्यास तात्पुरते नियम लागू केले होते. या नियमाअंतर्गत एका निश्चित मर्यादेच्या पलिकडे व्यावसायिकांना पेट्रोल, डिझेल खरेदी करता येत नव्हते. आता मात्र व्यावसायिकांना पेट्रोल पंपावरून कोणत्याही मर्यादेशिवाय पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे.

सरकारने निर्बंध का लागू केले होते?

मध्य-पूर्वेत युद्धामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती हळूहळू निवळत आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर इंधन पुरवठा साखळी पूर्वपदावर येत आहे. म्हणूनच भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. युद्धाच्या काळात सामान्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये. तसेच लोकांची अडचण होऊ नये म्हणून व्यावसायिक कामासाठी पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

भारतात देशातील 90 टक्के पेट्रोल पंप हे इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) , हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या पेट्रोलियम कंपन्यांच्या मालकीचे आहेत. या कंपन्यांकडून साधारण एक लाख पेट्रोल पंप चालवले जातात. १,००,००० हून अधिक पंप चालवतात. युद्धाच्या काळात या कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर डिझेलच्या मागणीत अचानक वाढ झाली होती. त्यामुळे पुरवठा साखळीवर मोठा ताण आला होता. दरम्यान आता सरकारने व्यावसायिक कामासाठी पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील निर्बंध हटवल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु