AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला शिवीगाळ करणाऱ्या मुलांना…; PM मोदींनी शेअर केला नवा इन्स्टा Video

PM Modi Latest Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मला शिवीगाळ करणाऱ्या मुलांना...; PM मोदींनी शेअर केला नवा इन्स्टा Video
PM Modi New Video on CJP ProtestImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 31, 2026 | 11:29 PM
Share

राजधानी दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आंदोलकांनी शिवीगाळ केली होती. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थी, तरुण आणि जनतेशी थेट संवाद साधत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच आंदोलनादरम्यान टीका किंवा शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

PM मोदींचा नवा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘मित्रांनो, आज तर फक्त तुमच्याशीच बोलावंसं वाटत आहे. जंतर-मंतरवर जे काही घडलं, ते देशाने आणि जगाने पाहिलं. काही खोडकर मुलांनी अतिशय अश्लाघ्य आणि अशोभनीय भाषेत शिवीगाळ केली. अशा प्रकारची भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही. मला शिवीगाळ करण्यात आली, इतकंच नव्हे तर माझ्या दिवंगत आईबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. त्या सगळ्याचं स्वरूप अत्यंत दुर्दैवी होतं.’

पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, ‘पण आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. लहानपणी चुका होतात आणि त्या चुका सुधारण्याची संधीही लहानपणीच मिळते, हेच तर बालपणाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे समाजात जो संताप आहे, तो मी पूर्णपणे समजू शकतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, हा खरंच एक मोठा धक्का आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘या मुलांना जवळ घेऊन योग्य मार्ग दाखवण्याची हीच वेळ आहे. ही दिशाभूल झालेली मुलं आहेत आणि त्यांना योग्य दिशा दाखवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयांच्या फेऱ्या मारायला लावणं किंवा समाजात त्यांचा छळ करणं, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो. समाजानेही माझी ही भूमिका स्वीकारावी, अशी माझी विनंती आहे. कारण माझ्या मनात एकच भावना आहे. कधी कधी आपल्या दातांखाली आपली जीभ येते आणि रक्तही निघतं. पण म्हणून आपण दात तोडत नाही, कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते.’

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं