PM Narendra Modi: बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला?; डेमोक्रसीवरून मोदींनी काँग्रेसच्या कृत्यांची यादीच वाचली

| Updated on: Feb 08, 2022 | 1:34 PM

लोकशाहीच्या मुद्द्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची अक्षरश: लक्तरे काढली. काँग्रेसच्या आजवरच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या कोणत्या पक्षांना कसा कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा, ही काँग्रेसची नीती राहिली आहे.

PM Narendra Modi: बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला?; डेमोक्रसीवरून मोदींनी काँग्रेसच्या कृत्यांची यादीच वाचली
पंतप्रधान मोदी
Follow us on

नवी दिल्ली: लोकशाहीच्या मुद्द्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काँग्रेसची (congress) अक्षरश: लक्तरे काढली. काँग्रेसच्या आजवरच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या कोणत्या पक्षांना कसा कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी राज्यसभेत वाचला. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा, ही काँग्रेसची नीती राहिली आहे. त्यानुसारच त्यांनी आजवरच्या राज्य सरकारांना त्रास दिला असून राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही त्रास दिला आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसने स्वपक्षीयांनाही सोडलं नाही. त्यांनाही या नीतीनुसार त्रास दिला असा घणाघाती हल्ला पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर चढवला. तसेच महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला घेरलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर भाषण केलं. आजच्या भाषणातही मोदींनी जोरदार बॅटिंग करत काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. लोकशाहीच्या मुद्द्यावरून मोदींनी काँग्रेसची अक्षरश: पिसे काढली. काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

कुणा कुणाचे सरकार पाडले, यादीच सादर

फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? असा सवालच मोदींनी केला.

ही लोकशाहाी होती का?

ज्या आंध्रप्रदेशने सरकार बनवण्यासाठी मदत केली त्यांच्यासोबत काय केलं. आंध्रचं विभाजन केलं. विभाजन करताना माईक बंद केले. चर्चाही केली नाही. ही लोकशाही होती का? ही पद्धत योग्य होती का? असा सवाल मोदींनी केला.

कोरोना मानवजातीसाठी संकट

कोरोना ही वैश्विक महामारी आहे. गेल्या 100 वर्षात एवढा भयंकर आजार कुणी पाहिला नव्हता. मानवजातीसाठी हे मोठं संकट होतं. हे संकट बहुरुपी आहे. नव्या रुपात वारंवार येत असतं. संपूर्ण देश आणि जग त्याच्याशी झुंज देत आहे. सर्वजण त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहेत. कोरोना काळात मोफत रेशन दिलं गेलं. नागरिकांच्या चुली विझू दिल्या नाहीत. कोरोना संकटात अनेक बंधने होती. तरीही गरीबांना पक्की घरे देण्याच्या दिशेने आपण काम केलं. गरीब कुटुंबाला घरे दिली. गावात शेतकऱ्यांना लॉकडाऊन मुक्त ठेवलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलं. याच काळात पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावले, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi: अचानक दृष्टी गेल्यानंतर जसं होतं तसंच 2014नंतर सत्ता गमावल्यावर काँग्रेसचं झालंय; पंतप्रधान मोदींचा घणाघाती हल्ला

अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ

Modi on Pawar | अवघ्या काही मिनिटात शरद पवारांचं मोदींकडून तीनदा कौतुक, काय म्हणाले पंतप्रधान?