
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जपानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या सोबत बुलेट ट्रेनचा प्रवास केला. त्यांनी सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या बुलेट ट्रेन चालक भारतीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटो सेशन केले. टोक्योत जपानमधील 16 राज्यांच्या राज्यपालांची भेट घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर टॅरिफ लादले आहे. त्या दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुखांची ही भेट ऐतिहासीक ठरली. येथून आज पंतप्रधान चीनसाठी रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौऱ्यातील दुसरा दिवस होता. पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासह बुलेट ट्रेनने प्रवास केला. या दरम्यान दोन्ही नेते हास्यविनोदात रमले. दोघांनी अनेक विषयावर चर्चा केली. या प्रवासानंतर पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर कारखान्याला भेट दिली. जपानच्या पूर्व भागात रेल्वे कंपनीत प्रशिक्षण घेत असलेल्या भारतीय ट्रेन चालकांशी त्यांनी संवाद साधला. जपानच्या पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर मोदी सोबतची ही छायाचित्र शेअर केली. त्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेंडाई येथे जात असल्याची कॅप्शन टाकली.
16 राज्यपालांशी मोदींची चर्चा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी त्यांच्या समाज माध्यम प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मोदींनी जपानमधील 16 राज्यांच्या राज्यपालांशी चर्चा केल्याचे म्हटले आहे. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी राज्य आणि प्रांतातील सहकार्यावर चर्चा केली. तर दोन्ही देशांमधील राज्यांमध्ये सहकार्य वृद्धिगंत व्हावे अशी अपेक्षा ही मोदींनी व्यक्त केली. 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनात दोन्ही देशातील राज्यात यापूर्वीपासून चर्चेची दारं खुली करण्यात आली आहे हे विशेष. राज्यांमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना,गुंतवणूक,कौशल्य विकास, स्टार्ट अप्स आणि एसएमई क्षेत्रात सहकार्य वाढण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधानांनी शेअर केली छायाचित्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर या बैठकीतील छायाचित्र शेअर केली. ही बैठक आणि दौरा हा दोन्ही देशातील संबंध मजबूत होण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशात व्यापार, नवीन कल्पना आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्याची मोठी संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.