
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतानच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. दिल्लीत विमान लँड होताच पीएम मोदी आपल्या निवासस्थानी न जाता ते थेट लोकनायक हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यांनी तेथे दाखल दिल्ली स्फोटातील जखमींची विचारपूस केली. पीएम मोदी यांनी या घटनेनंतर भूतानला असतानाच स्पष्ट केले होते की कोणत्याही षडयंत्रकाऱ्यांना सोडले जाणार नाही. दिल्ली ब्लास्ट प्रकरणात आज पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी भूतान येथून परतले आहेत.एलएनजेपी हॉस्पिटलला जाऊन त्यांनी दिल्ली स्फोटातील जखमींची विचारपूस केली. त्यांना योग्य उपचार मिळत आहे की नाही यांचीही त्यांनी खातरजमा करीत त्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी डॉक्टरांच्या टीमही भेट घेत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. हॉस्पिटलच्या जखमींची भेट घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणात एकाही दोषीला सोडले जाणार नाही. कट रचणाऱ्या योग्य तो धडा दिला जाईल अशी घोषणा केली.
लाल किल्ला मेट्रो ब्लास्ट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी UAPA ( बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) च्या कलम १६ आणि १८ , स्फोटक अधिनियम आणि BNS च्या कलमांतर्ग कोतवाली पोलिस ठाण्यात केस दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएला ( राष्ट्रीय तपास यंत्रणा ) सोपवला आहे.
अतिरेकी डॉ. उमर पुलवामाच्या कोईल येथील रहाणार होता. त्याने २०१७ मध्ये गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज श्रीनगरातून एमबीबीएस केले होते. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये ब्लास्ट झाला त्यातच अतिरेकी उमर असल्याचा संशय आहे. अजूनपर्यंत हे ठामपणे समजलेले नाही की या कारमध्ये तो होता की नाही. सध्या कारमधील मृताच्या डीएनए नमुन्याची चाचणी केली जात आहेत. त्यानंतरच कळू शकेल की उमर कारमध्ये होता की नाही.
सुरक्षा एजन्सीच्या वतीने अल फलाह युनिव्हर्सिटी, धौज, फतेहपूर तगा, फरीदाबाद आणि जम्मू-कश्मीरच्या वेगवेगळ्या भागात शोध मोहिम राबविली जात आहे. डॉ. उमर येथे शिकत होता.
येथे पोस्ट पाहा –
Went to LNJP Hospital and met those injured during the blast in Delhi. Praying for everyone’s quick recovery.
Those behind the conspiracy will be brought to justice! pic.twitter.com/HfgKs8yeVp
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2025
दिल्ली ब्लास्टमध्ये ठार झालेल्या लोकांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. यात खुलासा झाला आहे की अनेक जणांच्या कानाचे पडदे, फुप्फुसे आणि आतडी फाटली होती. तसेच मृतदेहाची हाडे तुटली होती. डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. तीव्र आणि खोल जखमा आणि प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची या पोस्टमार्टेम अहवालाने स्पष्ट झाले आहे.