PM नरेंद्र मोदी यांचा पगार किती? कोणत्या देशांच्या प्रमुखाला मिळतो सर्वाधिक पगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर पगार म्हणून किती पैसे मिळतात याबद्दल अनेकांना उत्सूकता असेल. अनेक देशांच्या प्रमुखांना भरपूर पगार दिला जातो. याबाबत पहिल्या स्थानावर कोण आहेत जाणून घ्या.

PM नरेंद्र मोदी यांचा पगार किती? कोणत्या देशांच्या प्रमुखाला मिळतो सर्वाधिक पगार
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:31 PM

Narendra Modi salary : भारतात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता सरकार देखील स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.  73 वर्षीय नरेंद्र मोदींचा यांनी या वेळी देशाला लवकरात लवकर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. पण तुम्हाला माहित आहे का की, पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना किती पगार मिळतो. पंतप्रधानांना पगाराशिवाय इतर भत्ते देखील मिळतात. जागतिक नेत्यांच्या तुलनेत भारताच्या पंतप्रधानांना किती पगार मिळतो चला जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींचा पगार किती?

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात महत्त्वाचे पद आहे. देशाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असते. अशा जबाबदारीच्या कामासाठी पंतप्रधानांना दरमहा 1.66 लाख रुपये पगार म्हणून मिळतो. म्हणजेच दरवर्षी सुमारे 20 लाख रुपये मिळतात.

या वेतनामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये असते, खर्च भत्ता 3,000 रुपये, संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि 2,000 रुपये दैनिक भत्ता समाविष्ट आहे.

मोदींनी यंदा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता ३.०२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते, ज्यामध्ये बाँड, डिबेंचर्स, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये कोणतीही गुंतवणूक नव्हती. त्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्याचे उत्पन्न दोन स्त्रोतांमधून येते. एक पंतप्रधान कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून आणि दुसरे त्यावर मिळणाऱ्या व्याजातून.

भारताच्या राष्ट्रपतींना किती पगार

भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा ५ लाख रुपये पगार म्हणून मिळतो. याआधी 2018 पर्यंत राष्ट्रपतींना 1.5 लाख रुपये पगार मिळत होता. त्याचबरोबर भारताच्या उपराष्ट्रपती 1.25 लाख रुपये मिळत होता. उपराष्ट्रपतींना आता 4 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो. एका रिपोर्टनुसार, खासदारांना 1 लाख रुपये मूळ वेतन मिळते. 2018 मध्ये खासदारांना शेवटची पगारवाढ मिळाली होती, जेव्हा त्यांचे पगार वाढले होते.

पंतप्रधानांना कोणत्या सुविधा मिळतात?

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना या शिवास सरकार घर देखील मिळते. ज्याचे कोणतेही भाडे आकारला जात नाही. ७ लोककल्याण मार्गावर हे सरकार घर आहे. याशिवाय पंतप्रधानांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कडून सुरक्षा दिली जाते. याशिवाय अधिकृत दौऱ्यांसाठी एअर इंडिया वन – एक विशेष विमान देखील मिळते. पंतप्रधान फक्त मर्सिडीज-बेंझ S650 गार्डमध्ये प्रवास करतात. ही पूर्णता बुलेट प्रुफ गाडी असते. पंतप्रधानांच्या गाडीवर एके-47 रायफलने हल्ला झाला तरी गाडीचे नुकसान होत नाही.

पंतप्रधान निवृत्त झाल्यानंतर, त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि अगदी SPG संरक्षण दिले जाते.

इतर देशांच्या प्रमुखांना किती पगार मिळतो

रिपोर्टनुसार, सिंगापूरच्या पंतप्रधानांना जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक पगार असतो. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना वार्षिक 2.2 मिलियन डॉलर (18.37 कोटी रुपये) वेतन म्हणून मिळतात.

हाँगकाँगचे महापौर जॉन ली का-चिऊ जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त पगार घेणारे नेते आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, त्यांना वर्षाला सुमारे $672,000 (रु. 5.61 कोटी) पगार म्हणून दिले जाते.

स्वित्झर्लंडचे पंतप्रधान तिसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांना वार्षिक 495,000 डॉलर (4.13 कोटी रुपये) वेतन दिले जाते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दरवर्षी 400,000 डॉलर (3.34 कोटी रुपये)  पगार मिळतो. या शिवाय इतर भत्त्यांमध्ये $50,000 चा अतिरिक्त भत्ता देखील मिळतो.व्हाईट हाऊस आणि एअर फोर्स वन सारख्या सर्वात आलिशान सुविधा देखील मिळतात.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना वर्षाला सुमारे $550,000 पगार मिळतो.

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक, ज्यांची वैयक्तिक संपत्ती त्यांना युनायटेड किंगडमचे आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत पंतप्रधान बनवते, त्यांना वार्षिक पगार $2,12,000 (रु. 1.77 कोटी) मिळतो. ते लंडनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहतात.

Non Stop LIVE Update
'मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली ते कल्याण दरम्यान...
'मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली ते कल्याण दरम्यान....
मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, 'त्या' इशाऱ्यानंतर दरेकरांचं थेट उत्तर
मिटकरींचा जीव किती? कुवत काय?, 'त्या' इशाऱ्यानंतर दरेकरांचं थेट उत्तर.
सगेसोयऱ्यांचा कायदा टिकणारच नाही, गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
सगेसोयऱ्यांचा कायदा टिकणारच नाही, गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.