PM Viksit Bharat Rozgar Yojana: नोकरी प्रायव्हेट, पैसा सरकारी; मोदींचा मास्टरस्ट्रोक, काय आहे योजना?

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा पोर्टल सोमवारी लाँच करण्यात आला. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दलची माहिती दिली. नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना काय आहे, ते जाणून घ्या

PM Viksit Bharat Rozgar Yojana: नोकरी प्रायव्हेट, पैसा सरकारी; मोदींचा मास्टरस्ट्रोक, काय आहे योजना?
PM Narendra Modi and Vikasit Bharat Rojgar Yojna
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2025 | 8:15 PM

बेरोजगारी ही देशातील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक आहे. देशातील असंख्य सुशिक्षित तरुणांना नोकरी किंवा रोजगार मिळवणं आव्हानात्मक ठरतंय. सरकारने सांगितलेल्या आकड्यांनुसार देशात 3.1 कोटी लोक बेरोजगार आहेत. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत रोजगार योजने’ची (PM-VBR) घोषणा केली. या योजनेमुळे देशभरात 3.5 कोटी नोकऱ्यांची संधी उपलब्ध होण्याची आशा आहे. अशाने तर देशातील बेरोजगारीची समस्याच दूर होईल, नाही का? परंतु ही काही जादूची कांडी नाही, जी फिरवली की लगेच समस्या गायब होईल. बेरोजगारी हा काही गणिताचाही प्रश्न नाही, ज्यात बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करून उत्तर मिळेल. अर्थात बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. परंतु हे कसं शक्य होईल, हे समजण्यासाठी त्याचं सविस्तर विश्लेषण करणं गरजेचं आहे. सरकारने दिलेल्या आकड्यांनुसार देशात जवळपास 3.1 कोटी लोक बेरोजगार आहेत. कदाचित या आकड्यापेक्षा जास्त लोक देशात बेरोजगार असूही शकतात. परंतु...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा