Anmol Bishnoi : गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून पकडून भारतात आणलं, पण…केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्याबाबतीत घेतला एक मोठा निर्णय

Anmol Bishnoi : कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं. मागच्या महिन्यात त्याला तपास यंत्रणा भारतात घेऊन आल्या. पण आता त्याच्या चौकशी संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Anmol Bishnoi : गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून पकडून भारतात आणलं, पण...केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याच्याबाबतीत घेतला एक मोठा निर्णय
gangster anmol bishnoi
| Updated on: Dec 13, 2025 | 8:48 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला मागच्या महिन्यात अमेरिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणण्यात आलं. अनमोल बिश्नोई कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. अनमोल अमेरिकेत होता. भारत-अमेरिकेमध्ये असलेल्या गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याद्वारे त्याला भारतात आणण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी आहे. त्याच्या चौकशीमधून बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर येतील. पण त्याच्याबाबत गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

गँगस्टर अनमोल बिश्नोईचा एकवर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. गृह मंत्रालयाने कोणत्याही पोलीस किंवा तपास संस्थेला गँगस्टर अनमोल बिश्नोईचा एक वर्षासाठी ताबा घेण्यास मनाई केली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता कोणत्याही राज्य पोलीस दलाला किंवा एजन्सीला बिश्नोईची चौकशी करायची असल्यास, त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या आवारातच त्याची चौकशी करावी लागेल.

नुकत्याच प्रत्यर्पण करून भारतात आणलं

याचा अर्थ, मुंबई किंवा पंजाब पोलीस, ज्यांना त्याची चौकशी करायची आहे, ते त्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी खून प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरील अलीकडील गोळीबाराच्या घटनेतील प्रमुख आरोपी आहे. त्याला नुकत्याच प्रत्यर्पण करून भारतात आणलं गेलं आहे.

किती लाखाचं बक्षीस होतं?

वांद्रयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. बऱ्याच वर्षानंतर एका माजी आमदाराची अशा प्रकारे हत्या झाल्याने मुंबई हादरली होती. या शूटर्सना लॉरेन्स बिश्नोई गँगने पाठवलं होतं. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

बिश्नोई गँगची उत्तर भारतात मोठी दहशत

अनमोलने दिल्लीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला होता तसेच त्याने या व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा आदेशही दिला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलीस अनमोलला ताब्यात घेणार होते. पण आता गृहमंत्रालयानेच कोणात्याही एजन्सीला त्याला वर्षभरासाठी ताब्यात घेता येणार नाही असं म्हटलय. लॉरेन्स बिश्नोई गँगची उत्तर भारतात मोठी दहशत आहे.