मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले, पहिला Photo आला समोर, आता पुढे काय होणार?
Anmol Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आले आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. आता अनमोलचे पुढे काय होणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आले आहे. अनमोल बिश्नोईवर अनेक गंभीर आरोप आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात हात असल्याचा आरोप आहे. तसेच अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करण्यामागेही त्यचा हात असल्याचे समोर आलेले आहे. तो अमेरिकेत वास्तव्यास होता, मात्र आता त्याला भारतात आणण्यात आले आहे. त्याचा पहिला फोटोही समोर आला आहे. आता अनमोल बिश्नोईसोबत पुढे काय होणार ते जाणून घेऊयात.
अनमोल बिश्नोईला आता टप्प्या टप्प्याने विविध राज्यांमधील पोलीस कोठडीत नेले जाईल. मात्र सुरुवातीला एनआयए त्याचा ताबा घेईल, कारण एनआयएमे त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएची कोठडी संपल्यानंतर अनमोलला दिल्ली पोलीसांकडे सोपवले जाणार आहे. कारण अनमोलने दिल्लीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन केला होता. तसेच त्याने या व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली पोलीस अनमोलला ताब्यात घेतील.
मुंबई, पंजाब आणि राजस्थान पोलीसही अनमोलचा ताबा घेणार
यानंतर मुंबई पोलीसांचे गुन्हे शाखेचे पथक बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अनमोलला ताब्यात घेणार आहे. कारण अनमोलवर या हत्येचे संपूर्ण नियोजन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणी पंजाब पोलीस अनमोलची चौकशी करणार आहेत. तसेच राजस्थान पोलीसही विविध गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी करणार आहेत.

Anmol Bishnoi photo
लॉरेन्स बिश्नोई गँगला फटका
अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा धाकडा भाऊ आणि उजवा हात आहे. लॉरेन्स जेलमध्ये असल्याने अनमोल गँग चालवत होता. मात्र आता त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून यामुळे विविध प्रकरणांचा उलगडा होणार आहे. सर्व प्रकरणांची चौकशी झाल्यानंतर त्याला देशातील सर्वात सुरक्षित जेलमध्ये ठेवले जाणार आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा देशासह परदेशातही विस्तार
लॉरेन्स बिश्नोई गँग दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, चंदीगड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांसह कॅनडा, अमेरिका, पोर्तुगाल, दुबई, अझरबैजान, फिलीपिन्स आणि ब्रिटेनमध्येही पसरलेले आहे.
