भारतातील या गावात जाण्यापूर्वी पोलिसांची परवानगी लागते, अन्यथा कमाईवर पाणी सोडावे लागते

भारताची खरी ओळख खेड्यांतूनच होते. खेड्यात राहणारे लोक शेती, पशुपालन, मासेमारी आदीवर अवलंबून आहेत.अनेक खेड्यांत आता म्हातारी माणसेच रहातात काही मोजकी कुटुंबेच राहतात.पण एका गावात जाण्याआधी पोलिसांची पूर्व परवानगी लागते.

भारतातील या गावात जाण्यापूर्वी पोलिसांची परवानगी लागते, अन्यथा कमाईवर पाणी सोडावे लागते
indian village
| Updated on: Aug 03, 2025 | 6:05 PM

भारताच्या कोणत्याही खेड्यात सर्वजण मिळून मिसळून रहात असतात. गावातच परंपरा, संस्कृती आणि रितीरिवाज पाहायला मिळतात. आजही खेड्यात याची झलक येथे पाहायला मिळत असते. सर्व कुटुंबातील महिला एकमेकांच्या कामात हातभार लावतात.लहानमुले मातीत आणि शेतात खेळून मोठी होताता. आधी गावात वेगळीच चमक पाहायला मिळायची. आता काही बदल झाले आहेत, परंतू तरीही लोक आपल्या परंपरांना विसलेले नाहीत. देशातील प्रत्येक राज्यात विविध खेडी आहेत. त्या-त्या राज्याची संस्कृती तेथे नांदत असते. लोकांची जीवनशैली शहरांच्या तुलनेत खूपच वेगळी आणि आरोग्यदायी असते.

अलिकडे भारतात शहरांऐवीज व्हीलेज टुरिझम वाढले असून लोक शांतता आणि निसर्गाकडे आकर्षित होत आहेत. लोकांना संस्कृती जवळून पाहण्याचा आणि जाणून घेण्याची संधी व्हीलेज टुरिझममुळे मिळते. केंद्र आणि राज्य सरकारने देखील व्हिलेज टुरिझमला प्रोत्साहन दिले आहे.

यूपीत आहे असे एक गाव

आज आपण अशा एका गावाची माहिती जाणून घेणार आहोत. जेथे जाण्यासाठी तुम्हाला पोलिसांची परमिशन लागते. यामागचे कारण देखील मोठे अनोखे आहे.येथील लोक खूपच साधेभोळे आणि सहजजीवन जगत आहेत.

हे गाव युपी म्हणजे उत्तर प्रदेशात आहे. मीडियातील आकड्यांनुसार युपीत एक लाख खेडी आहेत. येथे मोठ्या संख्येने लोक रहातात. परंतू या गावात प्रवेश करण्याआधी पोलिसांची परवागनी लागते. जर पोलिसांनी परवागनी दिली तरच या गावात तुम्ही प्रवेश करु शकता. जर पोलिसांनी मनाई केली तर या गावात तुम्हाला प्रवेश मिळत नाही.

हथिया गाव

या अनोख्या गावाचे नाव हथिया असून ते उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आहे. यास ठाकूर गावाने देखील ओळखले जाते. येथील लोक मथुराच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळ्याच कारणासाठी ओळखले जाते. या गावात एकसौ एक महाठग राहातात.येथे अनेक राज्यातील पोलिसांचे येणे-जाणे चालू असते. त्यामुळे कोणत्याही बाहेरील इसमास येथे शिरण्यास मनाई आहे. युपी पोलिसांनी येथे सावधान असा सूचना बोर्डच लावला आहे. त्यावर लिहीले आहे की या गावात अनुमतीशिवाय प्रवेश घेऊ नये, अन्यथा तुमचा पैसा अडका आणि मौल्यवान वस्तू कायमच्या गेल्याच समजा. या गावातील लोक दुसऱ्या गावातील आणि शहरातील लोकांना लुटतात. या गावातील लोकांना टटलू नाव पाडण्यात आले आहे.

आधीच केले जाते सावध

या गावात येणाऱ्या लोकांना आधीच सावध केले जाते. जर या गावात सोन्याच्या विटा, स्वस्तात अपार्टमेंट, लिफ्ट वा जमीन विकत घेण्यास जात असाल तर तुमच्या सोबत फसवणूक होऊ शकते. येथे लोक सोन्याच्या पितळ विकतात. त्यामुळे या गावात जाण्याआधी पूर्व परवानगी घ्यावी लागते.जर तुमचा अशा प्रकारच्या लोकांशी सामना झाला तर सावधान राहा.तुम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क करु शकता.

( Disclaimer: ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. टीव्ही ९ मराठी या बातमीला दुजोरा देत नाही )