पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एक मोठा कट उघड; जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर
राज्य तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे, पोलिसांकडून दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यामागे काही स्थानिक लोकांचा देखील सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. या सर्व पार्श्वभूमीवर हल्ल्यानंतर स्थानिक लोकांची देखील चौकशी करण्यात आली होती, याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्य तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे, पोलिसांकडून दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे, या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली असून, काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य तपास यंत्रणा (SIA) ने आपल्या एका प्रसिद्धपत्रकार म्हटलं आहे की, पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलीस ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत. काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल विविध मार्गानं पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही वीस ठिकाणी छापेमारी केली, यामध्ये स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आले ते लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होते, या संघटनांनी दिलेल्या आदेशानुसार ते विविध सोशल मीडियाच्या माध्यमांमधून कट्टरपंथी विचारांचा प्रचार करत होते अशी माहिती देखील समोर आली आहे.
20 ठिकाणी छापेमारी
दक्षिण काश्मीरमधील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये राज्य तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे, वीस ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीमध्ये स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे, संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ते विविध दहशतवादी संघटनांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य तपास यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
