AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Mine News : तामिळनाडूत 300 फूट खोल खाणीत अपघात : 6 मजूर अडकले, 2 जणांची सुटका; बचावासाठी हेलिकॉप्टर

कामगार अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण सकाळी एनडीआरएफची चौथी बटालियन घटनास्थळी पोहोचली, त्यात 30 जवानांचा समावेश आहे. सकाळपासून एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.

Tamil Nadu Mine News : तामिळनाडूत 300 फूट खोल खाणीत अपघात : 6 मजूर अडकले, 2 जणांची सुटका; बचावासाठी हेलिकॉप्टर
तामिळनाडूImage Credit source: tv9
| Updated on: May 15, 2022 | 6:53 PM
Share

तिरुनेलवेली : तामिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुनेलवेली येथे शनिवारी रात्री 300 फूट खोल खाणीत (Mine) अपघात झाला. येथे एक मोठा दगड खाणीत पडल्याने हा अपघात झाला. ज्यात सहा मजूर अडकले. मात्र, खाणीतून दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही चार जण तिथे अडकले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुनीर पल्लम भागात एक बोल्डर खाणीत पडला. यानंतर मजुरांचा ट्रक मध्येच अडकला. तर खाणीची रचना अशी आहे की त्यामुळे बचाव कार्यात (Rescue) अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचण्यास आणि सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला आणखी काही वेळ लागू शकतो.

हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू

दक्षिण रेंजचे आयजी आसरा गर्ग म्हणाले की, आम्हाला सुरुवातीला 6 मजूर अडकल्याची बातमी मिळाली होती. अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुखरूप वाचवले आहे. तर बचावकार्यासाठी लांब हात असलेल्या हेवी ड्युटी क्रेनची आणि विशेषतः डोंगरावर चालण्यात तरबेज लोकांची मदत घेतली जात असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

कामगारांना वाचवण्यासाठी लागू शकतो वेळ

एनडीआरएफच्या पथकाने या कारवाईबाबत माहिती दिली की, कामगारांना वाचवण्यासाठी सकाळी हेलिकॉप्टर बोलावण्यात आले. आमचे मॉनिटरिंग टीम आतापर्यंतच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यासोबतच आम्ही तामिळनाडू प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. तर खाणीची रचना पाहता सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी थोडा वेळ लागेल हे स्पष्ट आहे. तसेच, खाणीमध्ये फक्त चार किंवा त्याहून अधिक लोक आहेत हे आम्ही आत्ता खात्रीने सांगू शकत नाही, असही आयजी आसरा गर्ग यांनी सांगितलं आहे.

सकाळपासून बचावकार्य सुरू आहे

वृत्तानुसार, कामगार अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण सकाळी एनडीआरएफची चौथी बटालियन घटनास्थळी पोहोचली, त्यात 30 जवानांचा समावेश आहे. सकाळपासून एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.