AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा खेडकर यांची शातिर खेळी?, एसओपीतही ती गोष्ट आली नाही; यूपीएससीचा मोठा दावा काय?

यूपीएससीने पूजा खेडकला मोठा झटका दिला आहे. खोट्या माहितीच्या आधारावर फेरफार करुन अर्ज दाखल केल्याने यूपीएससीने तिची उमेदवारीच रद्द केली असून यापुढेही तिला परीक्षा देता येणार नाहीये. पूजाने यूपीएससीच्या यंत्रणेपासून वाचण्यासाठी कशी शातिर खेळी केली हे देखील यूपीएससीने पुढं आणलं आहे.

पूजा खेडकर यांची शातिर खेळी?, एसओपीतही ती गोष्ट आली नाही; यूपीएससीचा मोठा दावा काय?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 31, 2024 | 4:29 PM
Share

पूजा खेडकर यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. कारण यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. इतकंच नाही तर त्यांना आता या पुढे ही या परीक्षेला बसता येणार नाहीये. पूजा खेडकर प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खोटी माहिती सादर करुन परीक्षा पास झालेल्या पूजा खेडकर यांना आता कोर्टाकडून ही धक्का बसू शकतो. त्यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. सरकारी वकिलांनी पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास ही विरोध केला आहे. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास ती चौकशीत पुढे सहकार्य करणार अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. त्यामुळे आता उद्या पूजा खेडकरच्या जामिनावर फैसला होणार आहे.

पूजा खेडकरची शातिर खेळी?

पूजा खेडकरवर वेगवेगळ्या नावाने अर्ज दाखल केल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या नावाने अर्ज दाखल केल्याने त्यांनी किती वेळी यूपीएससी परीक्षा दिली याची माहिती सिस्टमला पडताळणी करता आली नाही. पूजा खेडकरचे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससीने २००९ ते २०२३ या १५ वर्षांपासूनच्या सीएसईच्या १५,००० पेक्षा जास्त अंतिमपणे शिफारस केलेल्या उमेदवारांच्या उपलब्ध डेटावर त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या संख्येबाबत सखोल तपासणी केली. या सखोल तपासणीत, पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाशिवाय, कोणत्याही इतर उमेदवाराला सीएसई नियमानुसार परवानगी असलेल्या संख्ये पेक्षा जास्त प्रयत्न केल्याचे आढळून आले नाही.

पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या एकट्या प्रकरणात, यूपीएससीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिड्युर (एसओपी) त्यांच्या प्रयत्नांची संख्या मुख्यत्वे त्यांनी नाव आणि पालकांचे नाव बदलल्यामुळे शोधू शकली नाही. अशा प्रकारचे प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी यूपीएससी ही प्रणाली अधिक मजबूत करणार असल्याचं देखील यूपीएससीने म्हटलं आहे.

सरकारी वकिलांना जामिनाला विरोध

पूजा खेडकर प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टात सरकारी वकिलांनी पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन न देण्याची मागणी केली. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर गुन्हेगार ठरवला जातो. पण जर पूजा खेडकरला आधीच जामीन दिला तर ती चौकशीत सहकार्य करणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. पूजा खेडकरने जाणीवपूर्वक खोट्या माहितीच्या आधारावर अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांची संधी हुकली. असं ही वकिलांनी कोर्टात म्हटले आहे.

पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आता यूपीएससीने तक्रार दाखल केल्यानंतर उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. कोर्टाने जर जामीन फेटाळला तर मात्र त्यांना अटक होऊ शकते.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?