भारतासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाकिस्तान दणकन आपटला, देशात अभूतपूर्व गोंधळ, कोणत्याही क्षणी आणीबाणी, सरकार कोसळणार?
मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली, त्यानंतर आता आणीबाणीसाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान अशांत आहे. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये उठाव होत आहेत. एकीकडे बलुचिस्तानमध्ये बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सरकारच्या नाकात दम केला आहे. बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यांमध्ये युद्ध सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी तर बलूच बंडखोरांनी बलुचिस्तान पूर्णपणे स्वतंत्र देश झाल्याची देखील घोषणा केली होती. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी पीओकेमध्ये मोठी आंदोलनं झाली होती. अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं आहे. पाकिस्तानमध्ये या सर्व घडामोडी सुरू असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे पाकिस्तानचं टेन्शन आणखी वाढलं असून, आणीबाणी लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.
पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटकडून खैबर पख्तूनख्वा प्रातांत तडखाफडकी आणीबाणी लागू करून राज्यपालांची राजवट लागू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता इथे कोणत्याही क्षणी येथील सरकार बरखास्त होऊन आणीबाणी लागण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळीच पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधानांकडून राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्याकडे संविधानाच्या आर्टिकल 232 आणि 234 अनुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतामधील सरकार बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रांतामध्ये पीटीआयची सत्ता आहे. या प्रांतामध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सरकारचं राज्यावरील नियंत्रण संपूर्णपणे सुटलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लादून, हे सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती देताना गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी म्हटलं की, खैबर पख्तूनख्वा प्रातांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या राज्यात आणीबाणी लावल्याशिवाय आता आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. या प्रांतामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये 195 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान पाकिस्तानने भारतासह इतर देशांविरोधात दहशतवादाचा वापर केला, मात्र पाकिस्तानने भारतासाठी जो दहशतवादाचा खड्डा खोदला होता, त्या खड्ड्यात आता स्वत:च पाकिस्तान पडल्याचं दिसून येत आहे.