मोठी बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल हादरलं; शक्तिशाली स्फोट

मोठी बातमी समोर येत आहे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल प्रदेश हादरलं असून, राज्यातील सोलन जिल्ह्यातल्या नालागढ पोलीस स्टेशनच्या परिसरात प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मोठी बातमी! वर्षाच्या पहिल्याच दिवशी हिमाचल हादरलं; शक्तिशाली स्फोट
explosion In Himachal Pradesh
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 01, 2026 | 3:42 PM

हिमाचल प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील सोलन जिल्ह्यातल्या नालागढ पोलीस स्टेशनच्या परिसरात प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट पोलीस स्टेशनच्या जवळच एका गल्लीमध्ये झाला आहे. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, या स्फोटाचा आवाज 400 ते 500 मीटरपर्यंत ऐकू गेला. या स्फोटामुळे परिसरात असलेल्या इमारती आणि आर्मी हॉस्पिटलच्या काचांना तडे गेले आहेत. काचा पूर्णपणे तुटल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं, पोलिसांनी हा संपूर्ण परिसर आता बंद केला आहे. या परिसरात येण्यास पोलिसांनी नागरिकांना मज्जाव केला आहे, स्फोट कोणी केला? कसा झाला याचे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला, कोणी केला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

मात्र दिलासादायक बातमी म्हणजे या स्फोटात कोणाचाही मृत्यू झालेला नाही, किंवा मालमत्तेच देखील मोठं नुकसान झालं नाही. या घटनेनंतर आता एसपी बद्दी विनोद धीमान आणि फॉरेंन्सिकचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, हा स्फोट नेमका कसा झाला? कोणी केला का?  याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेनंतर लोकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रचंड मोठा स्फोट होता. या स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर पर्यंत ऐकू आला. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, या परिसरात असलेल्या इमारतीच्या काचांना तडे गेले आहेत, काचा फुटल्या आहेत. तसेच या परिसरात असलेल्या आर्मी हॉस्पिटलचं देखील मोठं नुकसान झालं आहे, खिडक्या तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. दरम्यान वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. नागरिकांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव केला आहे.