भाजपने आदिवासींची नावे मतदार यादीतून वगळली; अभिनेते प्रकाश राज यांचा आरोप
अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत की, कर्नाटकात हजारो आदिवासींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. भाजप अशा लोकांना लक्ष्य करत आहे जे आवाज उठवू शकत नाहीत. मृत व्यक्तींची नावे यादीत असताना, जिवंत मतदारांना वगळले जात असल्याने हा गंभीर लोकशाहीविरोधी प्रकार असून, यावर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कर्नाटकातील हजारो आदिवासींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. भाजपच्या लोकांनी ही नावे वगळली आहेत. जे लोक आवाज उठवू शकत नाही. अशा लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे. सीजेपीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश राज यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
कर्नाटकातील हजारो आदिवासींना एसआयआरचा फटका बसला आहे. पाच हजार लोक आहेत, त्यांना त्यांची नावं कुठे गेली हेच माहीत नाही. भाजपच्या लोकांनी तिथल्या मुस्लिम लोकांची नावे डीलिट केली आहेत. जे लोक आवाज उठवू शकत नाहीत त्यांना मतदार यादीतून काढलं जात आहे. कर्नाटकात हा धक्कादायक प्रकार सुरू आहे, असा आरोप प्रकाश राज यांनी केला आहे.
मृतांची नावे मतदार याद्यांमध्ये
यावेळी पत्रकार परिषदेत इतर आंदोलकांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जिवंत लोकांची नावे मतदार याद्यातून वगळले जात आहे. मृतांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. हा सर्व सावळा गोंधळ सुरू आहे, असा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
आम्ही या देशाचे नागरिक नाही का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्तेवरून जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोदी हतबल झाले आहेत. देशाचं संरक्षण करणारी फौज आमच्याविरोधात वापरली जात आहे. हे सरकार इतकं हतबल झालं आहे. एका वोट चोराला वाचवण्यासाठी अमित शाहांनी एवढी पोलीस फौज लावली आहे. आम्ही भारतीय नागरिक नाही का? आम्हाला आंदोलन का करू दिलं जात नाही? असा सवाल या आंदोलकांनी विचारला आहे.
फंडिंगची गरज नाही
या देशातील प्रत्येक व्यक्ती तिरंग्याला आपलं मानतो. ज्यांनी तिरंग्यासाठी रक्त सांडवलं नाही, आज तेच लोक आमच्यावर हल्ला करत आहेत. ब्रिटिशांची हातमिळवणी करणारे हे हेच लोक आहेत. तेच आज हुकूमशाहा बनून राज्य करत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही कॉकरोच आहोत. त्यांना आम्ही घाण वाटतो. त्यांना प्रश्न विचारणं आवडत नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली. तसेच, आम्ही वर्गणी गोळा करून काम करत आहोत. आमच्या गरजा भागवत आहोत. आम्हाला कोणत्याही फंडिंगची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.